Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये पत्नी आणि मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

| Updated on: Jul 01, 2022 | 5:30 PM

भोजरामच्या भावाने उटाई पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. भोजरामने आधी पती आणि मुलांची हत्या केली. मग स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये पत्नी आणि मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
Follow us on

छत्तीसगड : अज्ञात कारणा (Unknown Reason)वरुन पत्नी आणि दोन मुलांची हत्या (Murder) करुन पतीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात घडली आहे. एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उटाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान मयतांनी असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याचा तपास करीत आहेत. भोजराम साहू (30) असे हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

कामावरुन घरी परतला अन् काही वेळाने थेट मृतदेहत आढळला

जिल्ह्यातील उटाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरपोटी गावात साहू कुटुंबीय राहतात. घरी भोजराम याच्या कुटुंबीयांसह त्याची आई आणि भाऊही राहतात. मयत भोजराम साहू हा भिलाई स्टील प्लांटमध्ये मजुरीचे काम करत होता. नेहमीप्रमाणे कामावरुन घरी आल्यानंतर त्याने आत गेल्यानंतर दरवाजा आतून लावून घेतला. बराच वेळ झाला त्याने दरवाजा उघडला नाही. म्हणून भोजरामच्या भावाने खिडकीतून डोकावून पाहिले तर आतील दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. भोजरामचे संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत पडले होते.

आत्महत्येमागील कारण अनभिज्ञ

भोजरामच्या भावाने उटाई पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. भोजरामने आधी पती आणि मुलांची हत्या केली. मग स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलीस तपासानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती उटाई पोलीस ठाण्याच्या प्रभारी मोनिका पांडे यांनी दिली. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. मात्र आजतागायत ठोस काहीही समोर आलेले नाही, असे पांडे म्हणाल्या. (Husband commits suicide by killing wife and children for unknown reasons in Chhattisgarh)

हे सुद्धा वाचा