घोर कलियुग! लग्नानंतरही बायको बॉयफ्रेंडच्या प्रेमात; नवऱ्याने दोघांचं मंदिरात लग्न लावून दिलं

घोर कलियुगचं म्हणावं लागेल. कारण एका व्यक्तीने त्याच्या बायकोचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडशी लावून दिलं. नवऱ्याने दोघांचं लग्न मंदिरात लावून दिलं.

घोर कलियुग! लग्नानंतरही बायको बॉयफ्रेंडच्या प्रेमात; नवऱ्याने दोघांचं मंदिरात लग्न लावून दिलं
marriage
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 9:58 AM

लग्नानंतर अनेक जोडपे संसार सुखाचा करण्याचा विचार करत असतात. अनेक जोडपे स्वप्न रंगवत असतात. परंतु उत्तर प्रदेशाच्या तरुणाच्या आयुष्यात भयंकर घडला. लग्नाच्या एका वर्षानंतर त्याची बायको अचानक बेपत्ता झाली. त्याने धावत पळत पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर बायको बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याची बायको हरदोईमध्ये सापडली. परंतु सत्य कळताच नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

पोलिांनी तपास केल्यानंतर त्याची बायको बॉयफ्रेंडसोबत हरदोईमध्ये सापडली. तिला पोलीस स्टेशनमध्ये आणून मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची बायको बॉयफ्रेंडसोबतच राहण्यावर ठाम होती. तिच्या नवऱ्याने अनेक वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याची बायको ऐकायला तयार नव्हती. अखेर त्याने बायकोचा हात बॉयफ्रेंडला देऊन टाकला. त्यानंतर दोघांचं लग्न एका मंदिरात लावून दिलं. त्यानंतर बायको तिच्या बॉयफ्रेंडसोबत निघून गेली.

काय आहे प्रकरण?

सोनाली आणि तिचा बॉयफ्रेंड हे एकाच शाळेत होते. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अनेक वर्षांचं मैत्रीचं नाते हे प्रेमात बदललं. सोनालीच्या प्रेमाविषयी तिच्या कुटुंबीयांना माहिती होती की नव्हती, याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोनालीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न पब्लिक रिलेशन ऑफिसर जवान विक्कीसोबत लावलं. लग्नानंतर सोनाली सासरी पोहोचली. पतीसोबत राहत होती. त्याचवेळी सोनाली ही बॉयफ्रेंडच्या संपर्कात होती.

सोनाली 5 सप्टेंबर रोजी अचानक सासरहून बेपत्ता झाली. बराच वेळ घरी न आल्याने नवऱ्याने तिची शोधाशोध सुरू केली. पुढे पोलिसांत जाऊन तक्रार दिली. तक्रारीनतंर पोलिसांनी बेपत्ता सोनालीचा तपास सुरू केला. त्यावेळी तिच्या मोबाइलचं लोकेशन हरदोईमध्ये आढळलं. त्यानंतर पोलिसांनी हरदोईमध्ये धाव घेतली. त्यावेळी सोनाली ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत आढळून आली.

सोनालीला तातडीने पोलीस स्टेशनला हजर केलं. पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही कुटुंबीयांना बोलावलं. नवरा विक्कीच्या कुटुंबीयांनी सोनालीची समजूत काढली. सोनाली आणि विक्कीने पुन्हा संसार करावा, असं दोन्ही कुटुंबीयांचं म्हणणं होतं. सोनालीची बराच वेळ समजूत काढली. परंतु सोनाली ही बॉयफ्रेंडसोबत जाण्यावर ठाम होती. तिने नवऱ्यासोबत राहायचं नाही, असं स्पष्ट केलं. सोनालीच्या नकाराने पोलीस स्टेशनमध्ये एकच शांतता निर्माण झाली. सोनालीच्या नकाराने आता दोन्ही कुटुंब टेन्शनमध्ये आले.

सोनालीच्या भूमिकेनंतर नवऱ्याने मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं. नवरा विक्कीने स्पष्ट केलं की, तिला बॉयफ्रेंडसोबत राहायचं असेल, ती त्याच्यासोबत राहू शकते. बळजबरीला नात्यात स्थान नसल्याचे विक्कीने स्पष्ट केलं. विक्कीच्या भूमिकेनंतर वादावर तोडगा निघाला. त्याने सोनाली आणि तिच्या बॉयफ्रेंडचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. दोघांचं लग्न एका मंदिरात लावून दिले. हिंदू पद्धतीत लग्न लावण्यात आलं. मंदिरात सप्तपदी घेऊन सोनालीने बॉयफ्रेंडला नवरा म्हणून स्वीकार केलं. या लग्नात पती देखील हजर होता. लग्नाचा विधी झाल्यानंतर सोनाली बॉयफ्रेंडसोबत निघून गेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us