AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया

मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान आंदोलन करणे कठीण असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया
manoj jarangeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 11:13 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीत 15 दिवस उपोषण केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन उपोषणाचा नारा दिला आहे. मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी अंतरवाली सराटीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने सरकारची धावाधाव सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुंबईत गणेशोत्सवात आंदोलन करने हे कायदा सुव्यवस्था दृष्टीने अवघड आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणर नाही, याची काळजी घेतली पाहिजे. राज्यातील सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे, राज्याची दृष्टीने हे अयोग्य आहे’.

‘आमची भूमिका ही एकच आहे. फडणवीस आणि शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र या दोन्ही नेत्यांवर टीकाटीप्पणी केली जाते, हे महाराष्ट्राला पटत नाही. फडणवीस, शिंदे हे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करताय. गणेशोत्सव हा देशासहित राज्यातील सर्वांत माठा सण आहे, असेही बावनकुळे यांनी पुढे सांगितले.

राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील 18 पाऊस किमी आहे, आज पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. राज्याच्या दुष्काळाकडे लक्ष घालण्याच्या मुख्यमंत्र्‍यांनी सूचना दिल्या. दुष्काळासाठी काय काय उपोयजन करता येतील, त्यावर उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या. राज्याची परिस्थिती समोर आल्यावर त्यावर चर्चा होईल. त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री दौरे करणार संपूर्ण आढावा घेणार आहेत’.

नागपुरात ओयो हॉटेलबाबत नवीन नियम समोर आला आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘नागपूर ओयो होटल हॉटेलचे बोर्ड लागत आहे. लोक तक्रार करत आहे. त्यासाठी कडक नियम लागू केले आहे. त्यामुळे संपूर्ण रिकॉर्ड ठेवावे लागेल. जवळपास 90 दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्ड त्यांना ठेवावे लागणार आहे. पोलीस आणि प्रशासनाचं लक्ष यावर असेल’.

Follow Us
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका