AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejashree Pradhan : घटस्फोटाच्या 11 वर्षांनंतर तेजश्री दुसऱ्यांदा थाटणार संसार, स्वतःच म्हणाली..

Tejashree Pradhan : मराठीमोळी अभिनेत्री तेजश्रील प्रधान तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतेच, पण अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. घटस्फोटानंतर तेजश्री दुसरं लग्न कधी करणार? असा प्रश्न अनेकदा तिला विचारण्यात येतो, यावर तिने मोठं वक्तव्य केलं आहे.

Tejashree Pradhan : घटस्फोटाच्या 11 वर्षांनंतर तेजश्री दुसऱ्यांदा थाटणार संसार, स्वतःच म्हणाली..
Tejashree Pradhan
| Updated on: Sep 11, 2026 | 1:52 PM
Share

Tejashree Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. तेजश्री फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील तेजश्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर तेजश्री हिच्या घटस्फोटाची चर्चा रंगली असते. घटस्फोटानंतर तेजश्री हिने आपल्या पद्धतीने आयुष्य जगण्यावर अधिक जोर दिला… पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, तेजश्रीला पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तेजश्री हिने प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्री हिला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं. अभिनेत्रीला ‘पुन्हा लग्न करणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. तेजश्री हिला विचारलं, ‘तुला असं वाटतं की तू प्रेमात पडू शकतेस?’ यावर कोणताच विचार न करता अभिनेत्री म्हणाली, ‘नक्कीच…’, यानंतर, ‘तुला सेटल व्हायला आवडेल का?’, यावर तेजश्री म्हणाली, ‘का नाही? नक्कीच…’, सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चे आली आहे.

तेजश्री हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने स्वतःला एका ओळखीपुरतं मर्यादित ठेवलं नाही. तेजश्री आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल देखील खूप काही बोलत असते. तिने अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सांगायचं झालं तर, तेजश्री हिने अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत लग्न केलं.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्रीने शशांक याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. आता दोघांच्या घटस्फोटाला 11 वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे तेजश्री पुन्हा लग्न कधी करणार… याच प्रतिक्षेत चाहते आहेत.

तेजश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची...
Sanjay Raut | नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची तुफान चर्चा
अखेर ठरलं! मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही..
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही आलं समोर
नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
Mumbai Modi Express | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा! नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... दीपकेंचा सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत...
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत नेमकं काय सांगितलं?
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
BRICS परिषदेसाठी दिल्लीत मोठ्या हालचाली, पुतिन जिनपिंग आणि PM मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुक..
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा