आम्ही फारकाळ जगणार नाही, प्रथम तरुणांना लस द्या; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे वक्तव्य

| Updated on: Mar 01, 2021 | 1:20 PM

दुसऱ्या टप्प्यात ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. | COVID19 vaccine

आम्ही फारकाळ जगणार नाही, प्रथम तरुणांना लस द्या; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे वक्तव्य
तरुणांना कोरोनाची लस आधी दिली पाहिजे. माझ्या तुलनेत त्यांना आयुष्यातील आणखी बरीच वर्षे काढायची आहेत. मी फारतर आणखी 10-15 वर्षे जगेन, असे मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले.
Follow us on

नवी दिल्ली: देशातील ज्येष्ठ व्यक्तींऐवजी तरुणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी (Covid Vaccine) प्राधान्य दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केले. माझे वय आता 70 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तरुणांना कोरोनाची लस आधी दिली पाहिजे. माझ्या तुलनेत त्यांना आयुष्यातील आणखी बरीच वर्षे काढायची आहेत. मी फारतर आणखी 10-15 वर्षे जगेन, असे मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले. (Give COVID19 vaccine to youngsters rather than senior citizens)

भारतात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जून खरगे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही कोरोनाची लस घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मल्लिकार्जून खरगे यांनी माझ्यापेक्षा देशातील तरुणांना कोरोनाची लसीची अधिक गरज असल्याचे सांगितले.

दुसऱ्या टप्प्यात कोणाला कोरोना लस मिळणार?

या टप्प्यात ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. सरकारकडून या टप्प्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आलीय. या टप्प्यात सरकारी रुग्णालयासोबत खासगी रुग्णालयातही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. खासगी रुग्णालयात करोना लसीच्या एका डोससाठी केंद्रानं २५० रुपयांची किंमत निश्चित केलीय. सरकारी रुग्णालयांत करोना लस अगोदरप्रमाणेच मोफत मिळू शकेल.

पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोना लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सोमवारी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना कोरोनाची लस देण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ (Covaxine ) या स्वदेशी लशीला प्राधान्य दिले.

कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?

कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.

तुम्हाला आता लस मिळू शकते का?

सध्या सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही. कोव्हिड योद्धे, हायरिस्क कॉन्टॅक्टमधील कर्मचारी, आणि आता ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.

लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस नाही.

संबंधित बातम्या:

VIDEO: आसामचा गमचा, पुद्दुचेरी-केरळच्या नर्स, चेहऱ्यावर स्माईल, मोदी आहेत तर चर्चा होणारच!

देशी की परदेशी,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी कोणती लस घेतली?

(Give COVID19 vaccine to youngsters rather than senior citizens)