बेहिशेबी संपत्ती प्रकरणी IAS पूजा सिंघल यांची डायरी आता होणार डीकोड, डायरीतून हायप्रोफाईल गुपितं बाहेर येणार

| Updated on: May 08, 2022 | 8:11 PM

पूजा सिंघल यांच्या घरी टाकलेल्या धाडीत एक महत्त्वाची डायरी ईडी अधिकाऱ्यांचा हाती लागली आहे. या डायरीच्या आधारे अनेक हायप्रोफाईल नावेही या प्रकरणात बाहेर पडण्याची शक्यता आहे. पैशांची अफरातफर करताना कुणाकुणाशी व्यवहार केले, तसेच अनेक राजकीय नेते, अधिकारी, पत्रकार यांची नावे आणि मोबाईल नंबर या डायरीत असल्याची माहिती आहे.

बेहिशेबी संपत्ती प्रकरणी IAS पूजा सिंघल यांची डायरी आता होणार डीकोड, डायरीतून हायप्रोफाईल गुपितं बाहेर येणार
IAS Pooja and money
Image Credit source: social media
Follow us on

रांची (Ranchi) झारखंडमधील आयएएस अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal)यांच्या बेहिशोबी मालमत्ता (money laundering) प्रकरणी आता आणखी काही जण ईडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. पूजा सिंघल, त्यांचे पती अभिषेक झा, सीए आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी टाकलेल्या छाप्यांत आत्तापर्यंत १९.३१ कोटींची रोख मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. पूजा सिंघल यांच्या घरी टाकलेल्या धाडीत एक महत्त्वाची डायरी ईडी अधिकाऱ्यांचा हाती लागली आहे. या डायरीच्या आधारे अनेक हायप्रोफाईल नावेही या प्रकरणात बाहेर पडण्याची शक्यता आहे. पैशांची अफरातफर करताना कुणाकुणाशी व्यवहार केले, तसेच अनेक राजकीय नेते, अधिकारी, पत्रकार यांची नावे आणि मोबाईल नंबर या डायरीत असल्याची माहिती आहे. या डायरीत ज्यांची नावे आहेत, त्यांचीही आगामी काळात ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे.

१९.३१ कोटींची कॅश, १५० कोटींची मालमत्ता जप्त

पूजा सिंघल यांचे सीए सुमन कुमार यांच्या घरी आणि इतर ठिकाणी केलेल्या छापेमारीत १९.३१ कोटींची कोख रक्कम आणि त्या व्यतिरिक्त १५० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहेत. यासह २० नबावट कंपन्यांचे करारही सापडले आहेत, ज्य फक्त कागदोपत्री सुरु होत्या. यासह मनी लाँड्रिंगची माहिती असलेली डायरीही जप्त करण्यात आली आहे.

पूजा सिंघल यांच्या नीकटवर्तीयांच्या नावे अनेक कंपन्या

आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या नीकटवर्तीयांची नावे अनेक कंपन्यांच्या संचलाकपदांवर असल्याचेही ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या कंपन्यांच्या माधम्यातून काळा पैसा पांढरा केला जात होता. पूजा सिँघल यांचे सीए सुमनकुमार यांच्या राहत्या पत्त्यावरच सुमारे डझनभर कंपन्यांची नोंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांच्या संचालक पदांवर पूजा सिंघल यांचे नातेवाईक आणि नीकटवर्तीय असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

पूजा सिंघल यांच्याशी संबंधित २५ हून अधिक ठिकाणी छापेमारी

आयएएस पूजा सिंघल याच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणांत ज्या ज्या ठिकाणी छापेमारी झाली, त्यात रांचीतील त्यांचे निवासस्थान, लालपूर, बरियातूतील पल्स हॉस्पिटल, सरकारी निवासस्थान, त्यांचे पती अभिषेक यांचे घर, सीए सुमनसिंह यांचे घर यांचा समावेश आहे. यासह राजस्थानात जयपूर, . बंगालमध्ये कोलकाता, बिहारमध्ये मुज्जफरपूर, दिल्ली एनसीआर या ठिकाणांचा समावेश आहे.

<