
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तान पूर्णपणे हादरून गेला आहे. 6 ते 7 मेच्या मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (POJK) मधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू
या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान काल 7 मे रोजी बहावलपूरमध्ये भारतीय सैन्याने एअरस्ट्राइक केला. त्यात जैशच मुख्यालय उडवलं. मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 जणांचा यामध्ये मृत्यू झाला.
बॉम्बस्फोटांच्या मालिकेनं पाकिस्तान हादरलं
एवढंच नाही तर 8 मे रोजी सकाळपासून पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका सुरु झाली अन् पाकिस्तान हादरलं. पाकिस्तानमधील 13 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले झाले. ताज्या अपडेटनुसार या हल्ल्यात मसूद अझहरचा भाऊ राऊफ अजहर या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झाला आहे.
कंदहार अपहरणाचा मास्टरमाइंड
राऊफ अजहर आयसी-814 कंदहार अपहरणाचा मास्टरमाइंड होता. राऊफ अजहरचे कारनामे फक्त एवढ्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्याने आणखी अनेक घृणास्पद कृत्ये केली. तो केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोस्ट वॉन्टेड होता. अनेक देशांच्या नजरा त्याच्यावर होत्या.
नक्की कोण होता हा राऊफ अजहर?
ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या भावाचे तुकडे तुकडे झाले. राऊफ अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा धाकटा भाऊ आहे. राऊफ अजहर दीर्घकाळापासून जैश-ए-मोहम्मदचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता. 1999 मध्ये कंदहार येथे झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमान आयसी-814 च्या अपहरणात तो मुख्य सूत्रधार होता.
भारताचा आणखी एक शत्रू ठार
24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणारे आयसी-814 विमानाचे या पाच दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि पाकिस्तान, अमृतसर, दुबई मार्गे अफगाणिस्तानातील कंदहार येथील तालिबान-नियंत्रित प्रदेशात नेले. या अपहरणाचा उद्देश जैश-ए-मोहम्मदचे नेते मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांची सुटका करणे होता. या ऑपरेशनची योजना राऊफ अजहरने आखली होती आणि तो या कटात सक्रियपणे सहभागी होता. तेव्हा तो फक्त 24 वर्षांचा होता. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये राऊफ अजहरचा खात्मा करत भारताचा आणखी एक मोठा शत्रू मारला आहे.