…तर आमच्याकडे तिसरी लाट येणारच नाही; ‘या’ राज्यातील कोरोना नियंत्रणात, अनलॉकिंगची तयारी

| Updated on: May 23, 2021 | 12:55 PM

हा आलेख असाच उतरता राहिला तर आम्ही 31 मेपासून दिल्लीत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यास सुरुवात करु. | CM Arvind Kejriwal

...तर आमच्याकडे तिसरी लाट येणारच नाही; या राज्यातील कोरोना नियंत्रणात, अनलॉकिंगची तयारी
लॉकडाऊन
Follow us on

नवी दिल्ली: दिल्लीतील कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या खाली आल्यामुळे आता राज्यातील कोरोना (Coronavirus) परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्ली पुन्हा अनलॉक करण्याचे संकेत दिले. त्यामुळे आता महाराष्ट्रही दिल्लीच्याच पावलावर पाऊल ठेवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. (CM Arvind Kejriwal on Coronavirus situation and Lockdown in Delhi)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे सांगितले. हा आलेख असाच उतरता राहिला तर आम्ही 31 मेपासून दिल्लीत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यास सुरुवात करु, असे केजरीवाल यांनी सांगितले.

दिल्लीत काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचा दर 15 टक्क्यांपेक्षा जास्त होता. मात्र, आता हा दर 2.5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत कोरोनाचे 1600 नवे रुग्ण सापडल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.

…तर दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही

या पत्रकारपरिषदेत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व लोकांना वेळेत लस मिळाली तर तिसरी लाट येणारच नाही, असे म्हटले. त्यामुळे आम्ही दिल्लीतील सर्व नागरिकांना लवकरात लवकर लस देण्याची योजना आखत आहोत. त्यासाठी आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लस उत्पादक कंपन्यांच्या संपर्कात आहोत. लस खरेदीसाठी दिल्ली सरकार स्वत:कडील पैसे द्यायला तयार आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे (Corona Cases in India) सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 17 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 40 हजार 842 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या अडीच लाखांच्या खाली आली. कालच्या दिवसात 3 हजार 741 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोनाबळींच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा मानला जात आहे.

संबंधित बातम्या:

राजस्थानात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, दौसामध्ये 341 चिमुकले कोरोनाच्या विळख्यात

आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाही, निती आयोगाचा दिलासादायक दावा

(CM Arvind Kejriwal on Coronavirus situation and Lockdown in Delhi)