AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाही, निती आयोगाचा दिलासादायक दावा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल, असं डॉ. पॉल यांनी म्हटलंय.

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाही, निती आयोगाचा दिलासादायक दावा
Corona Third Wave
| Updated on: May 22, 2021 | 7:09 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनलं. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पण अजून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. मात्र, निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी एक दिलासादायक माहिती दिलीय. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल, असं डॉ. पॉल यांनी म्हटलंय. पॉल यांनी शनिवारी सांगितलं की, जर लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांच्यात कोणतेही लक्षणं नसतील किंवा साधारण लक्षणं असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असंही पॉल यांनी सांगितलं. (corona third wave is not dangerous for children, Member of the Policy)

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत आहे. त्यामुळे ही लाट नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे, असं व्ही. के. पॉल म्हणाले. तज्ज्ञ आणि सरकारकडून तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात आलीय. तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असू शकते, असं सांगण्यात आलंय. मात्र, शनिवारी बोलताना केंद्र सरकारने सांगितलं की, तिसऱ्या लाटेत मुलं सुरक्षित नसली तरी त्यांच्यावरील प्रभाव कमी असेल. मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांच्यात लक्षणं दिसून येणार नाहीत किंवा सर्वसाधारण लक्षणं असतील. सर्वसाधारणपणे त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासणार नाही.

तिसरी लाट येणारच का?

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार किंवा नाही यावर डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांमध्येच बरेच मतभेद सुरु आहेत. कारण, कोणत्याही साथीचा प्रकोप नेमकी कधी वाढेल, हे निश्चित नसते. त्यामुळे रोगाची एखादी साथ अचानक निघूनही जाते. केवळ पीक पॉईंटच्या काळात रोगाच्या साथीचा प्रभाव प्रचंड असतो. भारतामधील विविध राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कमी-अधिक प्रभाव पाहायला मिळत आहे.

कोरोनाची तिसरी लाट कशी असेल?

अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल. साधारणत: कोणत्याही साथीच्या रोगाची दुसरी लाट ही पहिल्याच्या तुलनेत दुबळी असते. कारण तोपर्यंत लोकांमध्ये रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. मात्र, कोरोनाच्या विषाणुंमध्ये होणारे म्युटेशन पाहता असा ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लस हाच एकमेव उपाय मानला जात आहे.

संबंधित बातम्या :

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही, तो जमिनीतून आपल्या शरिरात जातो – डॉ. तात्याराव लहाने

लक्ष्मणरेषा ओलांडू नये, अन्यथा काय होतं ते कोरोनाने दाखवलं : उद्धव ठाकरे

corona third wave is not dangerous for children, Member of the Policy

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.