India vs Pakistan : भारताने हे पाऊल उचलल्यास पाकिस्तान अक्षरक्ष: रडेल, सरकारकडे त्यांच्या महाविनाशाचा प्लान तयार
India vs Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने लष्करी कारवाई करण्याआधी डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला. सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाने पाकिस्तान बिथरला. पण भारताकडे त्यापेक्षाही अजून जालीम औषध आहेत. भारताने अजून एक निर्णय घेतल्यास पाकिस्तानवर अक्षरक्ष: रडण्याची वेळ येईल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारकडे पाकिस्तानला आर्थिक दृष्ट्या उद्धवस्त करण्याचा प्लान रेडी आहे. सिंधू जल करार स्थगित करण्यासह पाकिस्तानसोबत सर्व प्रकारचे व्यावसायिक संबंध संपवणं हा त्याचाच एक भाग होता. भारत आता त्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करु शकतो. सोबतच भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांच्या थांबण्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे.
भारतीय बंदरांमध्ये पाकिस्तानी जहाजांवर बंदी घातली, तर त्याचा अर्थ असा आहे की, पाकिस्तानी मालवाहू जहाज भारतीय बंदरांवर सामान आणू शकणार नाही. त्याचा पाकिस्तानी व्यापारावर नकारात्मक परिणाम होईल. त्याला आपला माल पोहोचवण्यासाठी अजून मोठी फेरी आणि अधिक महागड्या जागेचा वापर करावा लागेल. भारत सरकारने हे पाऊल उचललं, तर आधीच कमजोर झालेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजून मातीत जाईल. पाकिस्तानच्या जागतिक व्यापार मार्गासाठी भारतीय बंदरं एक मोठा लॉजिस्टिक सपोर्ट आगे.
पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल
पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर बंदी घातल्यास त्यांच्या अडचणी आणखी वाढतील. कारण पाकिस्तान काही सामानांसाठी भारतीय बंदरांवर अवलंबून आहे. प्रतिबंधामुळे त्यांची प्रोडक्ट्स सप्लाई बाधित होईल. याचा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. आधीच पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या निर्णयामुळे त्यांना अजून मोठा झटका बसेल. मागच्या आठवड्यात पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांचा एअरस्पेस बंद केला. भारताने पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राइक करुन काही निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला.
