जर स्फोटाने नोएडातील ट्विन टॉवर पाडले नाहीत, तर टॉवर तोडण्यासाठी लागतील दोन वर्ष, विशेषज्ञांनी काय सांगितले

| Updated on: Aug 27, 2022 | 9:21 PM

याबाबत अधिकारी उत्कर्ष मेहता यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की ट्विन टॉवर पाडण्यासाठी तीन पर्याय होते. पहिला डायमंड कटर, रोबोटचा वापर आणि इम्प्लोजन हे पर्याय होते. त्यासाठी लागणारा वेळ, निधी आणि सुरक्षा या मुद्द्यांवर एका पर्यायाची निवड करण्यात आली. डायमंड कटर पद्धतीने टॉवर पाडले असते तर त्याला दोन वर्षांहून अधिक काळ लागला असता. त्यासाठी लागणारा निधी हा इम्प्लोजन पद्धतीपेक्षा पाच पट अधिक होता.

जर स्फोटाने नोएडातील ट्विन टॉवर पाडले नाहीत, तर टॉवर तोडण्यासाठी लागतील दोन वर्ष, विशेषज्ञांनी काय सांगितले
ट्विन टॉवर
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – नोएडातील (Noida) 32 मजल्याचे ट्विन टॉवर (Twin Tower)रविवारी दुपारी अडीच वाजता पाडण्यात (demolish)येणार आहेत. 13 वर्षांच्या मेहनतीने तयार करण्यात आलेल्या या दोन बिल्डिंग अवघ्या 12सेकंदात जमीनदोस्त होतील. ट्विन टॉवर पासून केवळ 9 मीटर अंतरावर सुपरटेक एमरेल्ड सोसायटी आहे. तिथे 650 फ्लॅट्स असून अडीच हजार लोकं राहतात. या दोन्ही टॉवर्स तोडणाऱ्या डेमोलिशन फर्म एडिफिस इंजिनिअरिंग अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे टॉवर तोडण्यासाठी 3,500 किलो स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. हे ट्विन टॉवर पडल्यानंतर त्याचा सर्वाधिक परिणाम हा एमराल्ड कोर्ट आणि त्याला लागून असलेल्या एटीएस व्हिलेज या दोन सोसायट्यांवर होणार आहे.

दुसरीकडे यातील विशेषज्ञांनी सांगितले आहे की, हे ट्विन टॉवर सुरक्षितरित्या तोडण्यासाठी दोनच पर्याय होते. त्यातील पहिला स्फोटकांच्या मदतीने हा टॉवर काही सेकंदात जमीनदोस्त करायचा. किंवा दुसरा पर्याय होता तो हाताने तोडण्याचा, त्याला दोन वर्षांचा वेळ लागला असता. हे टॉवर्स 100 मीटर उंच आहेत, जे कुतुब मिनारहूनही अधिक उंच आहेत. इमारत तोडणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 28 ऑगस्ट रोजी वॉटरफॉल इम्प्लोजन पद्धतीने सुरक्षतरित्या हे टॉवर पाडण्यात येतील.

15 सेंकदापेक्षा कमी वेळ लागणार

त्यांनी सांगितले की एपेक्स टॉवर 32 मजल्याची तर सियान टॉवर 29 मजल्यांची आहे. हे डोन्ही टॉवर 15  सेकंदाच्या आत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतील. त्याचबरोबर या परिसरात असलेल्या इतर बिल्डिंग आणि दुकानांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. यातील एक बिल्डिंग अवघ्या 9 मीटरवर अंतरावर आहे. एडिफिस इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्विन टॉवर हे सुरक्षित असून, 150 टक्के त्यांना पूर्वनियोजित दिशेतच पाडले जाईल. या टॉवर्सच्या शेजारी राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये पेंट आणि प्लॅस्टरमध्ये थोड्या भेगा पडतील, यापलिकडे काहीही होणार नसल्याचे सांगण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

तीन पद्धतीने पाडता आला असता टॉवर

याबाबत अधिकारी उत्कर्ष मेहता यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की ट्विन टॉवर पाडण्यासाठी तीन पर्याय होते. पहिला डायमंड कटर, रोबोटचा वापर आणि इम्प्लोजन हे पर्याय होते. त्यासाठी लागणारा वेळ, निधी आणि सुरक्षा या मुद्द्यांवर एका पर्यायाची निवड करण्यात आली. डायमंड कटर पद्धतीने टॉवर पाडले असते तर त्याला दोन वर्षांहून अधिक काळ लागला असता. त्यासाठी लागणारा निधी हा इम्प्लोजन पद्धतीपेक्षा पाच पट अधिक होता. यात क्रेनने प्रत्येक भिंत, बीम कापावी लागली असती. रोबोटिक्स पद्धतीच्या वापरातही दीड ते दोन वर्ष लागली असती. त्यात मोठा आवाज झाला असता. त्याचा परिणाम आजूबाजूच्या इमारतींना भोगावा लागला असता. रोबोटिक्ससाठी डायमंड कटर पेक्षा कमी पण इम्प्लोजनपेक्षा जास्त निधी लागला असता.

तीन महिन्यांत या टॉवरचा राडारोडा हटवण्यासाठ लागणार

उद्याच्या कारवाईसाठी 3700 किलो स्फोटकं लावण्यात आली आहेत. टॉवरच्या 500 मीटर परिसरात कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. त्यात व्यक्ती आणि प्राणी यांचा समावेश आहे. हे टॉवर पडल्यानंतर सुमारे 55 ते 85 हजार टन राडारोडा होणार आहे. तो साफ करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.