या वनस्पतीची पानं म्हणजे सापांवर जालीम उपाय; पुडी बांधून फक्त एकदा घरात ठेवा, पुन्हा कधीच साप येणार नाही

गेल्या काही वर्षांमध्ये विशिष्ट प्राजातीच्या सापांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे, असे साप आपल्याला कुठेही दिसून येतात, तर दुसरीकडे काही दुर्मिळ प्रजातीच्या सापांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे.

या वनस्पतीची पानं म्हणजे सापांवर जालीम उपाय; पुडी बांधून फक्त एकदा घरात ठेवा, पुन्हा कधीच साप येणार नाही
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 9:32 PM

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहातो. कारण सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज असतात. साप हा विषारी असतो, तो चावला की आपला मृत्यू होऊ शकतो, ही भीती आपल्या मनात कोरली गेलेली असते. त्यामुळे आपण अनेकदा आपल्याला कुठेही साप दिसला अगदी मोकक्या मैदानात जरी साप दिसला की आपला त्याला थेट मारतो. त्यामुळे भारतामधून सापांच्या अनेकद दुर्मिळ प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु सत्य या उलट आहे, भारतामध्ये जेवढ्या काही सापांच्या प्रजाती आढळून येतात, त्यातील अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापाच्या प्रजाती या विषारी आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने फुरसे, घोणस, मण्यार आणि नाग या चार जातीचा समावेश होतो.

मात्र साप कोणताही असू द्या, विषारी असो, अथवा बिनविषारी त्याला कधीही मारू नका, अथवा पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका, कारण सापाबद्दल माहिती नसताना त्याला पकडण्याचा प्रयत्न तुमच्या जीवावर बेतू शकतो. तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या. सर्पमित्र सापांना रेस्क्यू करून सुरक्षित जागी सोडतील.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एक विचित्र प्रकार पहायला मिळत आहे, तो म्हणजे काही विशिष्ट प्रजातीच्या सांपाची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तर काही दुर्मिळ जातीच्या सापांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ज्या सापांची संख्या वाढली आहे, त्यामध्ये प्रमुख्याने घोणस या अतिविषारी सापाचा समावेश आहे. हा साप एकाचवेळी अनेक पिल्लांना जन्म देतो. त्यामुळे या सापांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

सापांपासून संरक्षण करण्यासाठी आजही ग्रामीण भागांमध्ये विविध उपाय केले जातात. त्यातील एक उपाय म्हणजे अफुमारीचा वेल ही एक विशिष्ट वेलवर्गीय वनस्पती आहे, ही वनस्पती प्रचंड कडू असते, तसेच तिच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. ग्रामीण भागांमध्ये घरात साप येऊ नये, म्हणून अनेकजण ही वनस्पती लावतात. तसेच या वनस्पतीचे पानं सावलीमध्ये सुकून जिथून-जिथून साप घरात घुसण्याची शक्यता असते, अशा सर्व ठिकाणी एका पुडीमध्ये बांधून ठेवले जातात. यामुळे साप घरात प्रवेश करत नाही.

Follow Us