मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला आणखी एक जबर धक्का, मोठी खळबळ, भारतही टेन्शनमध्ये

मध्य पूर्वेत युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा कच्च्या तेलाच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळ उडून देणारं विधान केलं आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला आणखी एक जबर धक्का, मोठी खळबळ, भारतही टेन्शनमध्ये
DONALD TRUMP (
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 7:55 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. या तणावाची झळ जगातील अनेक देशांना बसत आहे. जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याचा भारताला देखील मोठा फटका बसला आहे. अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, गॅस नसल्यामुळे हॉटेल चालकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीवर केंद्र सरकारचं लक्ष असून, इंधन तुटवडा दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यातच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारतासह संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे.

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. इराणने देखील जगाला इशारा दिला आहे. कच्च्या तेलाचे दर हे 200 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात, त्यासाठी जगानं तयार राहावं असं आपल्या इशाऱ्यात इराणने म्हटलं आहे. इराणकडून होर्मुज स्ट्रेट अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांसाठी बंद करण्यात आला आहे. या होर्मुज स्ट्रेटवर सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. अनेक कच्च्या तेलाची जहाजं इथे अडकून पडली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असातना डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

मध्य पूर्वेत युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. यामुळे तेलाचे दर वाढले आहेत. तेलाचे दर वाढले असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. जेव्हा-जेव्हा जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढतात, तेव्हा -तेव्हा अमेरिका खूप पैसा कमावते, त्यामुळे सध्या आमचं लक्ष हे तेलाच्या वाढत असलेल्या किंमतीवर नाही. तर इराणला अणू बॉम्बेच्या निर्मितीपासून रोखण्यावर आहे. इराणला थांबवणे हेच सध्या आमचं लक्ष्य आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकनं सैन्य होर्मुज स्ट्रेट मधून प्रवास करणाऱ्या जहाजांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरत आहेत. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान समोर आलं आहे. त्यामुळे आता कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us