IMD Rain Alert : मुसळधार पाऊस धुमाकुळ घालणार, मुंबई-पुण्यासह राज्याच्या या भागात अलर्ट जारी…

मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असून येत्या काही दिवसात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

IMD Rain Alert : मुसळधार पाऊस धुमाकुळ घालणार, मुंबई-पुण्यासह राज्याच्या या भागात अलर्ट जारी...
monsoon rain alert
| Updated on: Aug 14, 2026 | 9:46 PM

राज्यात गेल्या आठवडाभर पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची बरसात होणार आहे. तर पुण्यातील ग्रामीण भागातही रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची जोरदार बरसात होणार आहे. पुण्यात घाटमाथ्यावर येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या कोकण- गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतातही कर्नाटकाच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आंध्रात, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे काही भागात वीजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळातही अनेक जागी पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशात, ओडीसा आणि झारखंड येथील काही भागात वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

दिल्लीला ऑरेंज अलर्ट

राजधानी दिल्लीतही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिल्लीला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. अनेक भागात हलका ते मध्य सरी बरसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते.आता पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने दिल्लीत पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाने दिल्लीच्या तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us