IMD weather update : अतिमुसळधार पावसाचा इशारा, पाऊस दाणादाण उडवणार, हवामान विभागाकडून तातडीचा हाय अलर्ट

परतीचा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. हवामान विभागाकडून तब्बल 19 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. सोबतच ताशी 80 ते 85 किमी वेगाने वारे देखील वाहणार आहे. महाराष्ट्राबाबतही मोठी बातमी आहे.

IMD weather update : अतिमुसळधार पावसाचा इशारा, पाऊस दाणादाण उडवणार, हवामान विभागाकडून तातडीचा हाय अलर्ट
IMD weather update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 6:13 PM

पावसाने दीड महिना चांगलीच ओढ दिली होती. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पाऊस न झाल्याने त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. खरीप हंगामाचं प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच जलसाठ्यांमधील पाणीपातळी देखील कमी झाली आहे. मात्र आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) हाय अलर्ट देण्यात आला आहे. 19 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तराखंडला तर पावसाचा थेट रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र पावसासोबत आणखी एक मोठं संकट म्हणजे या काळात प्रति तास 80 ते 85 किमी वेगाने वारे देखील वाहणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमार बांधवांनी देखील समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून 27 सप्टेंब रोजी 19 राज्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-कश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात प्रति तास 80 ते 85 किमी वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर शनिवारी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसासोबतच या काळात जोरदार वारे देखील वाहणार आहेत. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा शक्यता आहे. परंतु पावसासोबतच जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us