कोरोना फैलावाबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाची महत्वपूर्ण बैठक; 8 राज्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा

| Updated on: Jul 10, 2021 | 9:41 PM

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल कमी होताच अनेक लोक पर्यटनासाठी बाहेर पडली आहेत. या गर्दीत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणात कशी ठेवल्या येईल, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. (Important meeting of Union Home Ministry regarding corona spread; A review of the situation in eight states)

कोरोना फैलावाबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाची महत्वपूर्ण बैठक; 8 राज्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा फैलाव अजून पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृत्यूचा आकडा रोज धडकी भरवत आहे. विषाणू रूप बदलत असल्यामुळे त्याचीही चिंता कायम आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पुन्हा अधिक सजग झाले आहे. कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू नये या अनुषंगाने सरकार पावले उचलत आहे. आज केंद्रीय गृहसचिवांनी अहमदाबादमध्ये बैठक घेतली. या बैठकीत पर्यटन स्थळे तसेच हिल स्टेशन परिसरात होत असलेल्या गर्दीबाबत व्यापक चर्चा करण्यात आली. (Important meeting of Union Home Ministry regarding corona spread; A review of the situation in eight states)

विविध राज्यांतील परिस्थितीचा आढावा

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल कमी होताच अनेक लोक पर्यटनासाठी बाहेर पडली आहेत. या गर्दीत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणात कशी ठेवल्या येईल, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. हिमाचल, उत्तराखंड, गोवा, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील कोरोना फैलावाचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांवरच आहे. याबाबत बैठकीत गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली. या उच्चस्तरीय बैठकीला केंद्रीय सचिवांसोबत नीती आयोगाचे प्रमुख सदस्य डॉ. व्ही. के. पॉल, आरोग्य सचिव राजेश भूषण तसेच 8 राज्यांचे मुख्य सचिव, डीजीपी आणि आरोग्य सचिव उपस्थित होते.

देशातील कोरोनाची सध्याची स्थिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 42,766 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,206 लोकांचा कोरोना विषाणूशी लढताना प्राण गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3,07,95,716 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4,07,145 लोकांना कोरोना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे गेल्या 24 तासांत आकडेवारीरूनही स्पष्ट झाले आहे. मागील 24 तासांत 45,254 लोकांनी कोरोना विषाणूंवर मात केली आहे.

महाराष्ट्र आणि केरळमध्ये अजूनही चिंता

देशात आतापर्यंत कोरोनातून बरे होऊन घरी परातलेल्यांची संख्या 2,99,33,538 आहे. असे असले तरी पॉझिटिव्हिटी रेट अजून अपेक्षेनुसार खाली न आल्यामुळे केंद्र सरकारची चिंता कमी झालेली नाही. महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये अजूनही चिंतेची परिस्थिती आहे. मागील आठवडाभरात देशात आढळून आलेल्या एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये निम्मे रुग्ण हे महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांतील आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. (Important meeting of Union Home Ministry regarding corona spread; A review of the situation in eight states)

इतर बातम्या

“विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता”, वेगळ्या विदर्भासाठी वामनराव चटपांचा एल्गार

बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दरवर्षी 10 दिवसांची ‘सरप्राईज’ सुट्टी मिळणार