बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दरवर्षी 10 दिवसांची ‘सरप्राईज’ सुट्टी मिळणार

रिझर्व्ह बँक इंडियाचा हा नवीन नियम शेड्यूल कमर्शियल बँकेशिवाय ग्रामीण विकास बँका, सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दरवर्षी 10 दिवसांची 'सरप्राईज' सुट्टी मिळणार
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 9:24 PM

नवी दिल्लीः आरबीआयनं पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयनं काही विशिष्ट पदांवर काम करण्याऱ्यांसाठी सुट्टींचं मोठं गिफ्ट दिलंय. ट्रेजरी आणि करन्सी चेस्टसह इतर संवेदनशील पदांवर काम करणाऱ्या बँक कर्मचार्‍यांना वर्षाकाठी किमान 10 दिवसांची सरप्राईज सुट्टी (Surprise Leave) मिळणार आहे. रिझर्व्ह बँक इंडियाचा हा नवीन नियम शेड्यूल कमर्शियल बँकेशिवाय ग्रामीण विकास बँका, सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (good news for bank employees is that they will get 10 days of ‘surprise’ leave every year)

RBI संवेदनशील पदांबाबत एक लिस्टही जारी करणार

आरबीआयने एप्रिल 2015 मध्ये या मुद्द्यावर आधीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या अशा प्रकारे किती सुट्ट्या दिल्या जातील हे स्पष्ट केलं नव्हतं. रिझर्व्ह बॅंकेने संवेदनशील पदांवर किंवा संचालन क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी अनिवार्य अनपेक्षित रजा धोरण अपडेट केलंय आणि 23 एप्रिल 2015 रोजीचे परिपत्रक रद्द केले. विशेष म्हणजे 2015च्या सर्क्युलरनुसार जे बँकर्स ट्रेजरी ऑपरेशन, करेंसी चेस्ट, रिस्क मॉडलिंग, मॉडल वॅलिडेशनसारख्या विभागात काम करतात त्यांना संवेदनशील मानलं जातं. RBI संवेदनशील पदांबाबत एक लिस्टही जारी करणार आहे. या लिस्टमधील कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी ‘Mandatory Leave’ अंतर्गत 10 दिवसांची सुट्टी अचानक दिली जाणार आहे.

RBI चा बँकांना 6 महिन्याचा कालावधी

आरबीआयने जारी केलेल्या सूचनांनुसार, सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. बँकांना त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजूर धोरणानुसार संवेदनशील पदांची यादी तयार करण्यास आणि वेळोवेळी यादीचा आढावा घेण्यास सांगण्यात आलेय. आरबीआयने बँकांना सहा महिन्यांत सुधारित सूचनांचे पालन करण्यास सांगितलेय.

RBI च्या बँकांना सूचना

आरबीआयने ग्रामीण विकास बँका आणि सहकारी बँकांसह बँकांना जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांअतर्गत काही सूचनाही दिल्यात. यामध्ये अनपेक्षित रजा देण्याचे धोरण तयार करण्यास सांगितले आहे. या सुट्टीदरम्यान संबंधित बँक कर्मचाऱ्याला अंतर्गत/कॉर्पोरेट इमेल वगळता प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन स्वरूपाच्या कोणत्याही कामाची जबाबदारी दिली जाणार नाही. सर्वसाधारण उद्देशाने अंतर्गत/कॉर्पोरेट ईमेलची सुविधा बँक कर्मचार्‍यांना उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

छोट्या बचत योजनेत पैसे गुंतवून बना लखपती, कसे ते जाणून घ्या…

वैयक्तिक कर्जापेक्षा सुवर्ण कर्ज अधिक चांगले; त्वरित पैसे उभे करण्याचा उत्तम मार्ग

good news for bank employees is that they will get 10 days of ‘surprise’ leave every year

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.