Delimitation Bill : भारताच्या परिसीमन विधेयकामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये येणार, कारण त्यात POK बद्दल मोठी तरतूद

Delimitation Bill : भारतीय संसदेत सादर होणाऱ्या परिसीमन विधेयकामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढणार आहे. कारण अजून विधेयकाचा मसुदा सार्वजनिक झालेला नाही. पण त्यात जे म्हटलय ते महत्वाचं आहे.

Delimitation Bill : भारताच्या परिसीमन विधेयकामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये येणार, कारण त्यात POK बद्दल मोठी तरतूद
Delimitation Bill
| Updated on: Nov 28, 2026 | 8:21 PM

केंद्र सरकारने नव्या परिसीमन विधेयकाच्या मसुद्यात पाकिस्तान अधिकृत काश्मीरचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या विधेयकाच्या माध्यमातून पाकिस्तानलाही संदेश देण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरला हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येईल. POK म्हणजे पाकव्याप्त काश्मीर. हा पीओकेचा भाग पाकिस्तानने बेकायदरित्या ताब्यात घेतला आहे. ज्या दिवशी पाकिस्तानचा POK वरील ताबा संपुष्टात येईल, त्या दिवशी पीओके अंतर्गत येणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा क्षेत्रात परिसीमन आयोग आपलं काम चालू करेल. ‘द ट्रिब्यून’ने आपल्या रिपोर्टमध्ये विधेयकाच्या मसुद्याचा हवाला देत हे म्हटलं आहे. अजूनपर्यंत या विधेयकाचा ड्राफ्ट सार्वजनिक करण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कॅबिनेटची बैठक झाली. त्यावेळी या विधेयकासह 132 वं संविधान संशोधन विधेयक, 2026 केंद्र शासित प्रदेश संशोधन विधेयक, 2026 ला मंजुरी देण्यात आली.

लोकसंख्येच्या बदलत्या आकड्यांनुसार प्रत्येक मतदारसंघात मतदारांना समान प्रतिनिधीत्व देणं हा परिसीमनचा मुख्य उद्देश आहे. संविधानाच्या अनुच्छेद 82 अंतर्गत संसद प्रत्येक जनगणनेनंतर एक परिसीमन अधिनियम लागू करते. त्या आधारावर स्वतंत्र परिसीमन आयोगाची स्थापना केली जाते. जम्मू-कश्मीर बद्दल परिसीमनचा इतिहास वेगळा आहे. अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर आणि जम्मू-कश्मीर पुनर्गठन अधिनियम, 2019 लागू होण्याआधी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा जागांचा परिसीमन जम्मू-काश्मीरचं संविधान आणि जनप्रतिनिधीत्व अधिनियमातंर्गत व्हायचं. केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली. या आयोगाने मे 2022 मध्ये आपला अंतिम रिपोर्ट सोपवला. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागा वाढून 83 वरुन 90 झाल्या. जम्मू क्षेत्रात 43 आणि काश्मीर खोऱ्यात 47 जागा आहेत.

Loading...

POK साठी भारताने विधानसभेच्या किती जागा ठेवल्यात?

जम्मू-कश्मीर पुनर्गठन अधिनियमच्या कलम 14(4)(a) अंतर्गत पाक अधिकृत काश्मीरसाठी विधानसभेत 24 सीट्स आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. हे भाग सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. तो पर्यंत या जागा रिक्त मानल्या जाणार. विधानसभेच्या प्रभावी सदस्य संख्येत या जागांचा समावेश केला जात नाही. नव्या परिसीमन (द्वितीय) विधेयक 2026 च्या माध्यमातून सरकारने स्पष्टपणे हे म्हटलय की, पीओकेच्या मुक्तीनंतर लगेच निवडणूक आयोग स्वत: परिसीमन आयोगाची भूमिका बजावेल आणि मतदारसंघांचं सीमांकन केलं जाईल.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us