AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने तस्करीत प्रचंड वाढ, यंदाच्या आर्थिक वर्षात DRI ने इतकं सोनं जप्त केलं

साल 2021 मध्ये महसुल गुप्तचर संचालनालयाने गुजरातच्या मुंद्रा बंदरातून हेरॉईनचा 20,000 कोटींचा साठा जप्त केला होता. संपलेल्या आर्थिक वर्षात महसूल गुप्तचर संचालनालयाने सोने आणि अमलीपदार्थांची मोठी कन्साईमेंट जप्त केली आहे.

सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने तस्करीत प्रचंड वाढ, यंदाच्या आर्थिक वर्षात DRI ने इतकं सोनं जप्त केलं
gold smuggling increasedImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 29, 2024 | 7:33 PM
Share

सोन्याच्या भाव गगनाला भिडल्यामुळे सोन्याच्या तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ( DRI ) ने यंदा देशभरात वर्षभरात सोने आणि अंमलीपदार्थांच्या मोठ्या  कन्साईन्मेंट पकडल्या आहेत की हा आकडा ऐकून धक्का बसेल. देशभरात संपलेल्या 2023 – 2024 आर्थिक वर्षांत तब्बल 3,500 कोटीचं सोनं आणि अंमली पदार्थ जप्त केल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाचे प्रधान महासंचालक मोहन कुमार सिंह यांनी स्पष्ट केले आहे. सोन्याचे भाव प्रचंड वाढल्याने सोनं स्मगलिंग करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सोन्याच्या किंमतीत तीव्र वाढ होत असताना सरकारने लावलेले 15 टक्के आयात शुल्क चुकवण्यासाठी सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

सोन्याच्या दरात झालेली वाढ आणि त्यामुळे सोने आयात करणाऱ्यावर असलेल्या कमी कराचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी सोन्याची प्रचंड आयात केल्याने सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दागिने आणि सुट्या भागांच्या आयात निर्बंध लादले आहेत. भारत सरकारच्या एकूण सोने आयात करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे एप्रिलमध्ये वस्तू व्यापार तूट 19.1 अब्ज डॉलरवर गेली होती. ती पाच महिन्यांतील सर्वाधिक उच्चांकावर पोहोचली आहे. सोने आयातीचे प्रमाणात 208.99 टक्क्यांची तीव्र वाढ होत ते गेल्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात 1 अब्ज डॉलर होते ते या एप्रिल महिन्यांत 3.11 अब्ज डॉलरवर पोहचले आहे.

सरासरी रोज दोन केसेस

या आर्थिक वर्षात ( मार्च – एप्रिल 2023-24 ) महसूल गुप्तचर संचालनालयाने या प्रकरणात देशभरात एकूण 623 केसेस नोंदविल्या आहेत. म्हणजे वर्षाला सरासरी दोन केस असे हे प्रमाण असून त्यातून 3,500 कोटी रुपयाचं सोनं आणि अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यात अंमली पदार्थ तसेच सायकोट्रॉपिक पदार्थ आणि जप्त केलेल्या सोन्याचा समावेश आहे. यात महागड्या सिगारेट्स, बनावट नोटा, वन्यजीव पदार्थ, सुपारी काजू आणि रक्तचंदनाचा समावेश देखील असल्याचे महसुल गुप्तचर संचालनालयाने म्हटले आहे.

देशातील सर्वात मोठा साठा जप्त

अनधिकृत अंमलीपदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमारेषेवरील बंदोबस्त वाढ करुन गस्त वाढविण्यात आली आहे. साल 2023 मध्ये आतापर्यंत 1,125 कोटीचे अंमलीपदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त झाले होते. यंदा आतापर्यंत 1,109 कोटीचे अंमलीपदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त झाले आहेत. साल 2021 मध्ये देशातील सर्वाधिक मोठी अमलीपदार्थांची कन्साईमेंट पकडण्यात आली होती. त्यावेळी महसुल गुप्तचर संचालनालयाने गुजरातच्या मुंद्रा बंदरातून हेरॉईनचा 20,000 कोटींचा साठा जप्त केला होता. टाल्कम पावडरच्या डब्यातून हे हेरॉईन लपवून आणले होते. दोन कंटेनरमध्ये 2,990 किलोचे हेरॉईन सापडले होते.

Follow Us
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?