AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती माझी आहे, एकदा गर्भपात झालाय, तू तिच्याशी..लग्नाच्या 10 दिवस आधी मोठं कांड आलं बाहेर, पण यात चूक नसताना फसला होणारा नवरा

20 एप्रिल 2026 रोजी लग्न होतं. पण त्याच्या 10 दिवस आधी एक फोन आला व सगळी स्वप्न क्षणात मोडली. यात होणाऱ्या नवऱ्याची काहीच चूक नव्हती. पण आता बिचाऱ्या नवरदेवावरच सारख्या पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. चूक नसताना त्याला हे का करावं लागतय समजून घ्या.

ती माझी आहे, एकदा गर्भपात झालाय, तू तिच्याशी..लग्नाच्या 10 दिवस आधी मोठं कांड आलं बाहेर, पण यात चूक नसताना फसला होणारा नवरा
Accused Lover & Bride
| Updated on: Apr 24, 2026 | 4:25 PM
Share

लग्नाला दहादिवस असताना अचानक नवरदेवाला एक फोन आला. मोबाइल उचलल्यानंतर समोरच्या बाजूने बोलणारा म्हणाला की, “तू तिच्याशी लग्न केलस तर संपवून टाकेन. ती माझी आहे.आमच्यात प्रेमसंबंध आहेत” त्यांच्यात काय नातं आहे, याचे पुरावे देखील त्या फोन करणाऱ्याने पाठवले. लग्नाला 10 दिवस उरलेले असताना अचानक असा फोन आल्याने वरपक्षाचे धाबे दणाणले. हा काय प्रकार आहे, त्याने ते गडबडून गेले. समोरच्याने लग्न मोडण्यासाठी दबाव टाकलेला. फोन करणाऱ्या नवरीमुलीचा कथित प्रियकर होता. यात खरंतर नवरदेवाची काहीच चूक नव्हती. त्यांची फसवणूक झालेली. पण आता परिस्थिती अशी आलीय की, जो नवरदेव होता, त्यालाच पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागत आहेत. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील हे प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

लग्न घर असल्याने सनईचे सूर घुमणार होते. लग्नाच्या पत्रिका वाटून झालेल्या.मिठाईवाल्यापासून मंडपवाल्यापर्यंत बुकिंग झाली होती. पण ऐनवेळी एक फोन कॉल आला आणि आनंद चिंता, दु:खात बदलून गेला. नवरदेवाला होणाऱ्या बायकोच्या प्रियकराने धमकी दिली. ती माझी प्रेयसी आहे. तिच्याशी लग्न केलस तर जीवे मारुन टाकीन. त्यानंतर नवदेव आणि त्याचे नातेवाईक एसपी ऑफिसच्या चकरा मारत आहेत.

डोळ्यात साठवलेली सर्व स्वप्न क्षणात मोडली

जबलपूरच्या अजित यादवचं लग्न बरेलाच्या महक यादव बरोबर ठरलेलं. 20 एप्रिल 2026 रोजी लग्न होतं. आपल्या ऐपतीपेक्षा अजितच्या कुटुंबाने जास्त खर्च केलेला. दीड ते दोन लाख रुपये मंडप, बँड-बाजा, जेवण, बस बुकिंग यासाठी खर्च केलेले. 10 एप्रिलला रात्री साडेनऊच्या सुमारास अजितच्या मोबाइलवर एक फोन आला आणि डोळ्यात साठवलेली सर्व स्वप्न क्षणात मोडली.

एकदा गर्भपातही केलाय

फोन करणाऱ्याने त्याचं नाव सचिन विश्वकर्मा सांगितलं. महक माझी प्रेयसी आहे. आमचा एकमेकांवर प्रेम आहे. त्याने काही फोटो आणि वॉइस रेकॉर्डिंग पाठवली. त्यानंतर अजितच्या पायाखालची जमीनच सरकली. आमच्यात शरीरसंबंध आहेत. एकदा गर्भपातही केलाय असा दावा सचिनने केला.

जो फसवला गेला त्याच्यावरच पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्याची वेळ

अजितने ही गोष्ट आपल्या कुटुंबाला आणि महकच्या घरच्यांना सांगितली. एकच गोंधळ उडाला. पंचायत बोलवण्यात आली. महकला विचारलं, तेव्हा तिने सचिन मित्र असल्याचं सांगितलं. लग्नानंतरही त्याच्याशी बोलणं बंद करणार नाही असं ती म्हणाली. अजितच्या कुटुंबाने यावर आक्षेप घेतला. त्यावरुन लग्न मोडलं. महकच्या कुटुंबाने लग्नाचे पैसे देण्याची तयारी दाखवली. पण नंतर माढोताला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अजित आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला, तशी तक्रार दिली. अजितचं म्हणणं आहे की त्यालाच आता खोट्या प्रकरणात फसवलं जातय. यासाठी त्याच्यावर पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्याची वेळ आलीय.

Follow Us
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?