Good News: भारतात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त, NFHS वर्ष 2019-20 सर्वेक्षणाचे आकडे जाहीर

| Updated on: Nov 25, 2021 | 1:11 PM

NFHS चे पाचवे सर्वेक्षण 2019-20 मध्ये करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात पहिला पुर्ण देशात, बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण इत्यादी निर्देशकांचे एकत्रितपणे गणना केली गेला. तसेच 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वेक्षण केले गेले.

Good News: भारतात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त, NFHS वर्ष 2019-20 सर्वेक्षणाचे आकडे जाहीर
Girls in India (PTI file photo)
Follow us on

नवी दिल्लीः भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये, पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या अहवालानुसार भारतात दर 1,000 पुरुषांमागे 1,020 महिला आहेत. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS) पाचव्या फेरीतील, म्हणजे 2019-20 च्या सर्वेक्षणानुसार हे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. 1990 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी “मिसिंग वूमन” हा शब्दप्रयोग केला होता, कारण महिला लोकसंख्या देशात कमी होती. तेव्हा भारतात 1000 पुरुषांमागे फक्त 927 महिला असं प्रमाण होत. मात्र, आता भारतात महिलांच्या संख्येत सुधारणा होत आहे ही देशासाठी चांगली बाब आहे. या सर्वेक्षणात बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण इत्यादी निर्देशकांचे एकत्रितपणे गणना केली जाते.

NFHS चं सर्वेक्षण एक ‘सैंपल सर्वे’ म्हणून मानला जातो. ही संख्या पुर्ण भारताच्या लोकसंख्येला किती लागू होते, हे पुढील राष्ट्रीय जनगणनेत कळेल. मात्र, ही संख्या कमी-अधिक प्रमाणात समान असणे अपेक्षित आहे.

मागच्या सर्वेक्षणात महिलांच्या संख्येचे प्रमाण कमी झाले होते

NFHS ने 2005-06 मध्ये केलेल्या तिसऱ्या सर्वेक्षणानुसार, भारतातील एकूण लोकसंख्येमध्ये पुरुष-महिलांची संख्या समान होती. म्हणजेच 1000 पुरुष : 1000 महिला असं प्रमाण होतं. पुढील सर्वेक्षणात हे प्रमाण समानच राहील किंवा वाढेल अशी अपेक्षा होती. पण, NFHS च्या चौथ्या 2015-16 च्या सर्वेक्षणात हे प्रमाण 1000 : 991 पर्यंत खाली आले. कोणत्याही NFHS किंवा जनगणनेत ही पहिलीच वेळ होती की महिला लोकसंख्येचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे.

NFHS चे पाचवे सर्वेक्षण 2019-20 मध्ये करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात पहिला पुर्ण देशात, बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण इत्यादी निर्देशकांचे एकत्रितपणे गणना केली गेला. तसेच 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वेक्षण केले गेले. या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, एनसीटी दिल्ली, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे सर्वेक्षण करण्यात आले, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले.

राष्ट्रीय स्तरावर, 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिला आणि मुलांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण सारखेच असल्याचे आढळून आले. NHFS-5 च्या फेज एक आणि फेज 2 मधील डेटा वापरून राष्ट्रीय स्तरावरील निष्कर्षांची गणना करण्यात आली आहे.

इतर बातम्या

यूरोपमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, तिसऱ्या लाटेनं मृत्यूचं तांडव, भारतासाठीही धोक्याची घंटा?

मोठी बातमी! आझाद मैदानावरील आंदोलनातून बाहेर पडण्याची खोत-पडळकरांची घोषणा, आंदोलनाचा निर्णय कर्मचाऱ्यांवर सोडला

ज्या आमदारासोबत राहुल गांधींच्या लग्नाच्या वावड्या उठल्या त्यांचाही भाजप प्रवेश, कोण आहेत अदितीसिंह?