देशात कोरोना लसीकरणाला वेग; आतापर्यंत112.91 कोटींहून अधिक जणांना दिला डोस

देशात लसीकरणाला वेग आला असून, आतापर्यंत एकूण 112 .91 कोटी लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात कोरोना लसीकरणाला वेग; आतापर्यंत112.91 कोटींहून अधिक जणांना दिला डोस
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 6:42 AM

नवी दिल्ली – देशात लसीकरणाला वेग आला असून, आतापर्यंत एकूण 112 .91 कोटी लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सोमवारी देखील 54 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ज्या लोकांना कोरोना होण्याचा अधिक धोका आहे, अशा लोकांची संख्या लक्षात घेऊन त्यांना लवकरात लवकर लसीचे दोनही डोस दिेले जावेत यासाठी केंद्राकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जनजागृती देखील करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

16 जानेवारीपासून झाली सुरुवात 

देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातील हे लसीकरण तीन टप्प्यात राबवण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि इतर आवश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, तर तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. हळूहळू लसीची उपलब्धता लक्षात घेऊन केंद्र सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांसाठी देखील लसीकरण सुरु केले आहे.

लसीकरणाचे आवाहन 

दरम्यान आतापर्यंत जरी 112 .91 कोटी लसीचें डोस देण्यात आले असले तरी देखील यातील अनेकांनी लसीचा पहिलाच डोस घेतला आहे. लसीचे दोनही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. ज्या लोकांचे लसीचे दोनही डोस घेऊन झाले आहे, देशात अशांची संख्या केवळ 35 टक्के असल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी एम्सकडून करण्यात आला होता. त्यामुळे लसीकरण वाढवण्यावर सरकारकडून भर देण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

नोव्हेंबरमध्ये सर्व राज्यांना अतिरिक्त 47,541 कोटी रुपये निधी मिळणार, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नोएड्यातील पोलीस ठाण्यात अजब तक्रार दाखल, पतीच्या सांगण्यावरुन पत्नीविरोधात हनीट्रॅपचा गुन्हा

धक्कादायक : मध्य प्रदेशात अमेझॉनवरुन 1 टन गांजाची तस्करी; ऑनलाईन अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश