
पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे माणसानं आयुष्यात एकदा तरी गेलच पाहिजे, मात्र अशा ट्रीप या खूप खर्चिक असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. भारत सोडून दुसर्या देशात जाण्यासाठी लागणारा खर्च हा आपल्याला परवडणारा नसतो, मात्र जगात असे देखील काही देश आहेत ते खूपच स्वस्त आहेत, तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल एवढ्या बजेटमध्ये देखील या देशाची ट्रीप करू शकता. पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. अनेकदा आपण जेव्हा अमेरिका किंवा ब्रिटनमध्ये जाण्याचा विचार करतो, तेव्हा तेथील चलन हे भारतीय रुपयांच्या तुलनेत खूपच मजबूत असल्यानं तो खर्च आपल्याला परवडणारा नसतो, जेव्हा रुपयाची तुलना डॉलरसोबत होते, तेव्हा एक डॉलर जवळपास 85 भारतीय रुपांबरोबर असतो. मात्र जगात असे काही देश आहे तेथील चलन हे भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे, त्यामुळे अशा देशांची ट्रीप आपल्या बजेटमध्ये बसू शकतो.
असाच एक देश आहे तो म्हणजे लाओस, लाओस हा दक्षिण पूर्व आशियामधील एक सुंदर असा देश आहे. या देशामध्ये अनेक पर्यटनस्थळ आहेत. तुम्ही अंदाजे पाच ते सहा दिवसांमध्ये हा संपूर्ण देश सहज फिरून येऊ शकता. जर तुम्ही लाओसला जाण्याचा विचार करत असाल तर लाओसला जाण्यासाठीचं विमान भाडं देखील तुमच्या बजेटमध्येच आहे. लाओसची राऊंड ट्रीप सर्वसामान्यपणे 30 ते 35 हजारांपासून सुरू होते, तुम्ही तुमच्या बजेटनुसार विमान प्रवासाचा पर्याय निवडू शकता.
लाओस हा एक सुंदर देश आहे, येथील संस्कृती, पर्यटनस्थळं, नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतात. या देशात तुम्हाला सर्व गोष्टी अगदी स्वस्त मिळतील, इतक्या स्वस्त की जर तुमच्या कडे दोन ते तीन हजार रुपये असतील तर विमानाचं भाडं सोडून तुम्ही या देशाची आरामात ट्रीप करू शकता. इथे या सर्व गोष्टी स्वस्त असण्याचं मुख्य कारण म्हणजे लाओसमध्ये जे चलन वापरलं जातं त्याला लाओशियन कीप असं म्हणतात, या चलनाच्या तुलनेत रुपया खूपच मजबूत आहे, म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार रुपये असतील आणि तुम्ही ते लाओसमधील चलनासोबत एक्सचेंज केले तर तुम्हाला त्याबदल्यात तब्बल 24 लाखांपेक्षा अधिक लाओसचं चलन मिळू शकतं.