UP Crime : उत्तर प्रदेशात संपत्तीसाठी मुलांकडून बापाची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी नदीशेजारी पुरला मृतदेह

| Updated on: Jun 11, 2022 | 3:10 AM

घटनेप्रकरणी सिद्धार्थनगरचे एसपी यशवीर सिंह यांनी अधिक माहिती दिली. मधुबनवा गावातील महिला सरस्वती यांनी त्यांचा पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता संशय मृत परशुराम यांच्या मुलांवर गेला. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोघांनी हत्येची कबुली दिली, असे सिंह यांनी सांगितले.

UP Crime : उत्तर प्रदेशात संपत्तीसाठी मुलांकडून बापाची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी नदीशेजारी पुरला मृतदेह
काटोलमध्ये कुत्र्यांचा पाच वर्षीय मुलावर हल्ला.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उत्तर प्रदेश : पैसे आणि संपत्तीसाठी मुलांनी आपल्या बापा (Father)ची हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात घडली आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह (Deadbody) नदीशेजारी पुरला. परशुराम असे मयत व्यक्तीचे नाव आहे. जेव्हा आईने मुलांकडे वडिलांबाबत चौकशी केली तेव्हा त्यांना नौगढमध्ये सोडल्याचे त्यांनी आईला सांगितले. मात्र बराच वेळ झाला तरी परशुराम घरी परतले नाहीत. यामुळे चिंतेत असलेल्या परशुराम यांच्या पत्नी सरस्वती यांनी सदर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी कसून तपास केला असता मुलांनीच वडिलांची हत्या केल्याचे उघड झाले.

हत्या करून मृतदेह नदीच्या काठावर दफन केला

सिद्धार्थनगर जिल्ह्यातील मधुबनवा गावातील ही घटना आहे. 4 जून रोजी या गावात राहणाऱ्या परशुरामचा राजाराम आणि सोनू या दोन मुलांशी मालमत्ता तसेच दारूसाठी पैसे मागितल्यावरून वाद झाला. या वादातून मुलांनी वडिल परशुराम यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी परशुराम यांनी 5 जून रोजी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगून दूध विकण्यासाठी घर सोडले. यादरम्यान दोन्ही मुलांनी परशुराम यांना वाटेतच गाठले आणि त्यांची निर्घृण हत्या केली. दोन्ही मुलांनी हत्या केल्यानंतर नाल्याच्या काठावर मृतदेह दफन केला आणि ते दोघे घरी परतले. परशुराम हे घरी परतले नाही म्हणून त्यांच्या पत्नी सरस्वती यांनी मुलांकडे चौकशी केली. त्यावर दोघांनी कोणतेही योग्य उत्तर दिले नाही.

पत्नीच्या तक्रारीनंतर चौकशीची सूत्रे फिरली

काही तास उलटल्यानंतरही पती घरी परतला नाही. त्यामुळे मोठ्या चिंतेत सापडलेल्या पत्नी सरस्वती यांनी सदर पोलिस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्यांना सर्वप्रथम मुलांवर संशय आला. त्या संशयावरून पोलिसांनी मुलांची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान मुलांनी वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच वडिलांची हत्या करून ​​मृतदेह कुठे पुरला, याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा

वडिलांनी बहिणीला संपत्ती दिली म्हणून राग

घटनेप्रकरणी सिद्धार्थनगरचे एसपी यशवीर सिंह यांनी अधिक माहिती दिली. मधुबनवा गावातील महिला सरस्वती यांनी त्यांचा पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता संशय मृत परशुराम यांच्या मुलांवर गेला. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोघांनी हत्येची कबुली दिली, असे सिंह यांनी सांगितले. मारेकरी मुलांनी मृतदेह पुरलेल्या हत्येच्या ठिकाणी नेले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील परशुराम हे आपली जमीन विकून मुलगी आणि जावयाला देत होते. त्याच रागातून आम्ही वडिलांची हत्या केली, असे आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले. (In Uttar Pradesh son murdered father for property dispute)