
BBC च्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर आयकर विभागाची धाड
बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून कार्यालयाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबई : BBC च्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आयकर विभागाकडून याबाबत अजून कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार बीबीसीच्या लंडनमधील कार्यालयाला याची माहिती देण्यात आलेली आहे.
मुंबई आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आलेली आयकर टीम दिल्लीची आहे. सध्या आयकर पथकाने बीबीसी कार्यालयात शोध सुरू केला आहे. बीबीसी कार्यालयात कोणालाही जाण्याची परवानगी नाही.
सिक्योरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी IT ची टीम येथे आली असून, त्यांची कारवाई सुरू आहे. विंडसर बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर बीबीसीचे कार्यालय आहे.
Published on: Feb 14, 2023 12:53 PM
Related Video
धमक्या दिल्या तर नेस्तनाबूत करून टाकू; CM फडणवीसांकडून ओपन चॅलेंज
सलमानने जे केलं, बॉलिवूडमध्ये कोणालाच जमणार नाही ! भाईजानने चक्क..
कांद्याने मुंबईकरांना रडवलं... कांदा महागला, किचनचं बजेट कोलमडलं
मराठी माणूस बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो - परप्रांतीय
मला मेंटली टॉर्चर..; दिपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर मोठा आरोप
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार