
भारत आज आपला 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संपूर्ण देश हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस जणू एखादा मोठा सणच असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावर सलग 12 व्यांदा ध्वजारोहण केले. तसेच, एमआय-17 हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. आजच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाच्या मुद्यावर भाषण ते केलं. ऑपरेशन सिंदूर, सिंधू जल करार, पाकिस्तानच्या कारवाया, दहशतवाद यावर ते बोलले. तसेच राष्ट्रीय स्वयंसोवक संघाची शतकपूर्ती, दिवाळीपूर्री देशवासियांना मोठं गिफ्ट, जीएसटीमध्ये बदल, तरूणांसाठी विकसित भारत रोजगार योजना तसेच आत्मनिर्भर भारत अशा अनेक मुद्यांवरही ते बोलले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाताली महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया.
ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना पंतप्रधान मोदींनी केला सलाम
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना अभिवादन केले. ते म्हणाले की, आपल्या शूर सैनिकांनी दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा दिली. दहशतवाद्यांनी सीमेवर नरसंहार केला होता. लोकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. मुलांसमोर त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. संपूर्ण भारत संतप्त होता. या हत्याकांडाने संपूर्ण जग हादरले होते. ऑपरेशन सिंदूर हा त्या संतापाचा परिणाम होता, असं मोदी म्हणाले.
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पाकिस्तानला इशारा दिला की भारत आता अणु धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही कोणतंही ब्लॅकमेल सहन करणार नाही आणि योग्य उत्तर दिले जाईल. सिंधू पाणी कराराबाबत त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला स्पष्ट केलं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकणार नाही.
देश नैसर्गिक आपत्तींना तोंड देतोय
पंतप्रधान मोदींनी नैसर्गिक आपत्तीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, निसर्ग आपल्या सर्वांची परीक्षा घेत आहे. गेल्या काही दिवसांत आपण नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, ढगफुटी इत्यादींना तोंड देत आहोत. पीडितांसोबत आमची सहानुभूती आहे. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार बचाव कार्य, मदत कार्य आणि पुनर्वसन कार्यात पूर्ण ताकदीने एकत्र काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पाकिस्तानची उडाली झोप
पाकिस्तानची झोप उडाली आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस इतका मोठा आहे की दररोज नवीन खुलासे होत आहेत, नवीन माहिती बाहेर येत आहे. 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यांनी रणनीती आणि लक्ष्य ठरवले, त्यांनी वेळ देखील ठरवली आणि नंतर आमच्या सैन्याने ते केले जे अनेक दशकांपासून घडले नव्हते. शत्रूच्या हद्दीत शेकडो किलोमीटर घुसून, दहशतवाद्यांचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आणि दहशतवाद्यांच्या इमारतींचे अवशेषात रूपांतर झालं, असं मोदींनी सांगितलं.
भारताचं सामर्थ्य
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून भारताची ताकद सांगितली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही मेड इन इंडिया लढाऊ विमानांवर काम करत आहोत. समुद्रात असलेल्या साठ्यांचाही शोध घेत आहोत. आपण खनिजांच्या क्षेत्रात स्वावलंबी होत आहोत. आपला UPI जगाला आश्चर्यचकित करत आहे. भारत आपल्या अंतराळ केंद्रावर काम करत आहे. आयटी क्षेत्रात स्वावलंबी होत आहोत. देशाच्या गरजेनुसार खतांचे उत्पादन करा.
‘आत्मनिर्भर भारत’ हा विकसित भारताचा पाया
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुलामगिरीने आपल्याला गरीब बनवले, आपल्याला परावलंबी बनवले, आपले इतरांवरचे अवलंबित्व वाढले. स्वातंत्र्यानंतर लाखो लोकांना अन्न पुरवणे हे एक मोठे आव्हान होते, परंतु माझ्या देशातील शेतकऱ्यांनी कठोर परिश्रम करून देशाचे अन्नसाठे भरले. अन्नधान्याच्या क्षेत्रात देश स्वयंपूर्ण झाला. आजही, राष्ट्राच्या स्वाभिमानाचा सर्वात मोठा निकष म्हणजे त्याचे स्वावलंबन. ‘आत्मनिर्भर भारत’ हा विकसित भारताचा पाया आहे.
दिवाळीपूर्वी देशाला मोठं गिफ्ट
या दिवाळीपूर्वी देशाला एक मोठी भेट दिली जाईल असं पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सांगितलं. दिवाळीत जीएसटी सुधारणा केली जाईल आणि कर मोठ्या प्रमाणात कमी केले जातील. दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. जीएसटी कमी करणे ही काळाची गरज आहे. सामान्य लोकांसाठी टॅक्स कमी केला जाईल, असं मोदी म्हणाले.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi says, “This Diwali, I am going to make it a double Diwali for you… Over the past eight years, we have undertaken a major reform in GST… We are bringing next-generation GST reforms. This will reduce the tax burden across the… pic.twitter.com/2hAPP0CFtH
— ANI (@ANI) August 15, 2025
पीएम विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना जाहीर केली. ही योजना 1 लाख कोटी रुपयांची आहे. याद्वारे खाजगी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्या तरूणांमा 15 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या योजनेमुळे तरुणांना रोजगार मिळेल. ही योजना आज अर्थात 15 ऑगस्टपासूनच लागू होत आहे.
RSSची शतकपूर्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्णन जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असं वर्णन त्यांनी केलं पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100 वर्षे गौरवशाली सेवा केली आहे. संघाच्या 100 वर्षांच्या सेवेचा देशाला अभिमान आहे. ते राष्ट्र उभारणीसाठी काम करते.
2047 पर्यंत आपण भारताला विकसित बनवू
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश सुदर्शन चक्र मिशन लाँच करेल. त्यांनी 2047 सालापर्यंत भारताला विकसित करण्याचा संकल्प केला आणि ते तसे करेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासाठीच, आपण थांबणार नाही , आपण झुकणार नाही. ज्यांनी कठोर परिश्रम केले आहेत त्यांनीच इतिहास घडवला आहे. काळ बदलण्याची हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे.