AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची 5G नेटवर्कमध्ये ‘हनुमान उडी’, दिग्गज देशांना मागे सोडत गाठला मोठा पल्ला

5G Speed in India: नेटवर्क टेस्टिंग आणि एनालिस्ट फर्म Ookla च्या अहवालानुसार, 2024 भारत 5G डाउनलोडिंग स्पीडच्या बाबत 14 व्या क्रमांकावर होता. भारतात ही स्पीड 301.86 Mbps होती. त्यावेळी मीडियन अपलोडिंग स्पीड 18.93 mbps राहिली.

भारताची 5G नेटवर्कमध्ये 'हनुमान उडी', दिग्गज देशांना मागे सोडत गाठला मोठा पल्ला
5G नेटवर्क
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 01, 2024 | 2:46 PM
Share

भारतात 5G नेटवर्क सुरु होऊन वर्षभराचा कालावधी झाला आहे. वर्षभरापूर्वी 5G नेटवर्कचा वेग खूपच खराब होता. परंतु वर्षभरात परिस्थिती बदलली आहे. भारतातील 5G नेटवर्कचा स्पीड चांगलाच सुधारला आहे. यामध्ये भारताने ‘हनुमान उडी’ घेतली आहे. भारत जगभरातील बड्या देशांना मागे सोडत 5G नेटवर्कमध्ये टॉप 15 देशांच्या यादीत पोहचला आहे. या पंधरा देशांमध्ये 5G नेटवर्कचा वेग सर्वाधिक चांगला आहे. भारतात जिओ आणि एअरटेलकडून हायस्पीड 5G नेटवर्कची सेवा दिली जात आहे. भारतात मेट्रो सिटीमध्ये 5G सेवा सुरु झाली आहे. परंतु अजून ही सेवा सामान्य शहरांमध्ये सुरु झाली नाही. या वर्षभरात देशात सर्वत्र 5G नेटवर्क सुरु होण्याची शक्यता आहे.

अपलोडिंग स्पीडमध्ये भारत अव्वल

नेटवर्क टेस्टिंग आणि एनालिस्ट फर्म Ookla च्या अहवालानुसार, 2024 भारत 5G डाउनलोडिंग स्पीडच्या बाबत 14 व्या क्रमांकावर होता. भारतात ही स्पीड 301.86 Mbps होती. त्यावेळी मीडियन अपलोडिंग स्पीड 18.93 mbps राहिली.

भारत 5G रोलआउट

भारत 5G रोलआउट सर्वात वेगवान करण्याच्या बाबतीत जगात सर्वात पुढे आहे. भारतात डिसेंबर 2023 पर्यंत 400 हजार 5G बेस स्टेशन होते. जानेवारी 2023 नुसार विचार केल्यास त्यात तब्बल 7.7 टक्के वाढ झाली आहे. 2023 चौथ्या तिमाहीत 5G मीडियन डाउनलोडिंग स्पीड 301.86 mbps होती. 4G स्पीडच्या तुलनेत ही 18 पट वेगवान होते. तसेच 5G अपलोडिंग स्पीड 16.05 mbps नोंदवण्यात आली. ती 4G च्या तुलनेत 5 पट फास्ट होती.

या देशांमध्ये चांगली स्पीड

  1. युएई – 654 mbps
  2. कतर – 516 mbps
  3. साउथ कोरिया – 485 mbsp
  4. मलेशिया – 451 mbps
  5. ब्राझील – 449 mbps
  6. डोमिनिकन रिपब्लिक – 403 mbps
  7. बहरीन – 375 mbps
  8. कुवैत -369 mbps
  9. मकाउ – 338 mbps
  10. सिंगापूर – 329 mbps
  11. सऊदी अरब – 323 mbps
  12. न्यूझीलँड – 316 mbps
  13. बुलगारिया – 306 mbps
  14. भारत – 301 mbps

Follow Us
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...