ठरलं तर मग, PM मोदींच्या रशिया दौऱ्यानंतर मोठा निर्णय, नाशिकचं महत्त्व आणखी वाढणार, जाणून घ्या

Su-30 Fighter Jet : पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जगातील सर्वात शक्तीशाली असलेल्या लढाऊंची निर्मिती महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात करणार आहेत. कोणता ते जाणून घ्या.

ठरलं तर मग, PM मोदींच्या रशिया दौऱ्यानंतर मोठा निर्णय, नाशिकचं महत्त्व आणखी वाढणार, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 5:43 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बैठक पार पडली. मॉस्को बैठकीदरम्यान मोठा निर्णय घेण्यात आलाय. भारत रशिया दोन्ही देश मिळून विमानांची निर्मिती करणार असणार असल्याची माहिती रशियामधील स्फुटनिका या वृत्तसंस्थेने दिली आहे. भारत देश सुखोई 30 चे उत्पादन करू शकतो, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये नव्या विमानांचं उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान रशिया दौऱ्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन्ही देश भारतात Su-30 फायटर जेटची निर्मिती संयुक्तपणे करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.  Su-30 ही लढाऊ विमाने महाराष्ट्रातील नाशिक येथील ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या कारखान्यात बनवली जाणार आहेत. नाशिकमधील या कारखान्यात याआधी मिग-21 ही लढाऊ विमाने तयार करण्यात आली होती. ही लढाऊ विमाने भारतात बनवून जगभर पाठवली जातील. सुखोई एसयू-30 फायटर जेटचा जगातील अनेक देशांच्या हवाई दलांकडून समावेश  केला जातो. यावरून तुमच्या लक्षात येईल की हे विमान किती शक्तिशाली आहे.

सुखोई- 30 लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये

Su-30 च्या हार्डपॉईंटमध्ये गोळीबार करण्यासाठी अधिक सुविधा आहेत. एकापेक्षा जास्त रॅक लावले तर त्यात 14 शस्त्रे बसवता येतील. हे एकूण 8130 किलो वजनाची शस्त्रे उचलू शकते. त्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रेही यामध्ये लावला येतात.

सुखोई- 30 मध्ये 30 मिमी ग्रिजाएव-शिपुनोव्ह ऑटोकॅनन बसवले आहे. जे एका मिनिटात 150 राउंड फायर करते, म्हणजे शत्रूची विमाने, ड्रोन किंवा हेलिकॉप्टर सुटू शकत नाहीत. यात 12 हार्ड पॉइंट आहेत. 4 प्रकारचे रॉकेट लावता येऊ शकतात. चार प्रकारची क्षेपणास्त्रे आणि 10 प्रकारचे बॉम्ब लावले जाऊ शकतात.  भारतामधील (Hindustan Aeronautics Limited) ही कंपनी Su-30MKI विमान बनवते. 1997 मध्ये या कंपनीने रशियाकडून लायसन्स घेतलं होतं.

Non Stop LIVE Update
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान.
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी.
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी.
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली...
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली....
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली...
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली....
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे.
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे.
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे.
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल.
म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; अजित पवार यांचं विधान
म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; अजित पवार यांचं विधान.