संयुक्त राष्ट्राचा भारतासंदर्भात धक्कादायक अहवाल, 2065 पर्यंत असे संकट येणार?

युनोकडून हा अहवाल भारत, अमेरिका, इंडोनेशिया अशा १४ देशांवर तयार करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, १९६० मध्ये भारताची लोकसंख्या ४३ कोटी होती आणि त्यावेळी प्रत्येक महिला सरासरी ६ मुलांना जन्म देत होती.

संयुक्त राष्ट्राचा भारतासंदर्भात धक्कादायक अहवाल, 2065 पर्यंत असे संकट येणार?
| Updated on: Jun 12, 2025 | 12:22 PM

भारत जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे. यामुळे संसाधनांसाठी भारतात संघर्ष वाढत आहे. पुढील दोन दशकांत भारताची लोकसंख्या १.७ अब्ज होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारताच्या लोकसंख्येत झपाट्याने घट होण्याची भीती आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. युनोच्या अहवालात म्हटले आहे, ४० वर्षानंतर म्हणजे २०६५ मध्ये देशाच्या लोकसंख्येत मोठी घट होणार आहे.

युनोकडून व्यक्त होणारी चिंता योग्य दिसत आहे. कारण भारतातील जन्मदरात घट झाली आहे. हा जन्मदर १.९ वर आला आहे. हा जन्मदर २.१ असणे आवश्यक आहे. जन्मदर कमी झाल्यामुळे देशाची लोकसंख्या कमी होण्याचा धोका आहे. जन्मदर या पद्धतीने कमी होत राहिले तर जन्मदराची ग्रोथ निगेटीव्ह येणार आहे. ही परिस्थिती २०६४ पर्यंत येऊ शकते. संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या निधीच्या अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.

१४ देशांवर अहवाल

युनोकडून हा अहवाल भारत, अमेरिका, इंडोनेशिया अशा १४ देशांवर तयार करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, १९६० मध्ये भारताची लोकसंख्या ४३ कोटी होती आणि त्यावेळी प्रत्येक महिला सरासरी ६ मुलांना जन्म देत होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. शिक्षण, परिवार नियोजन आणि आर्थिक परिस्थिती यामुळे आता कमी मुलांना जन्म महिला देत आहेत. अनेक महिला फक्त एकाच मुलांना जन्म देतात. सध्याच्या भारतातील सरासरीचा विचार केल्यावर एका महिलेकडून दोन मुलांना जन्म दिला जात आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाकडून तयार करण्यात आलेल्या या अहवालात बिहारचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यात तीन पिढ्यांचा अभ्यास केला गेला. बिहारमधील ६४ वर्षीय महिला स्वरस्वती देवी यांना पाच मुले होते. त्यांची सून ४२ वर्षीय अनिता म्हणते, माझे १८ व्या वर्षी लग्न झाले. मला सहा मुले आहेत. मी इतक्या मुलांना जन्म देणार नव्हती. परंतु सासू आणि सासऱ्यांनी केलेल्या आग्रहामुळे सहा मुलांचा जन्म झाला. अनिताची मुलगी पूजा आहे. ती २६ वर्षांची आहे. तिचे अजून लग्न झाले नाही. परंतु दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म देणार नाही, असे ती म्हणते.