
Census Alert: देशात २०२७ मध्ये होणारी जनगणना ऑनलाइनसुद्धा होणार आहे. जातीय गणनेची मोजणी आणि जनगणना प्रथमच डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच एक वेब पोर्टल लॉन्च करण्यात येईल. त्या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक स्वत: आपली माहिती भरु शकणार आहे. या पोर्टलवर लोकांना आपले रजिस्ट्रेशन करुन आपली आणि आपल्या परिवाराची संपूर्ण माहिती देता भरता येणार आहे. जनगणनेसाठी विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकणार आहे.
देशात यापूर्वी 15 वेळा जनगणना झाली आहे. त्यावेळी जनगणनेची आकडेवारी येण्यासाठी सुमारे 18 महिने लागले होते. परंतु आता 16 व्या जनगणनेची आकडेवारी केवळ 9 महिन्यांत मिळणार आहे. डिजिटल सेन्ससला डेटा जोडण्यात येणार आहे. तसेच तो डेटा सेंट्रल सर्व्हरला सरळ पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे जनगणनेचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. एप्रिल ते डिसेंबरपर्यंत डेटा प्रोसेसिंग आणि विश्लेषणाचे काम होणार आहे. डिसेंबर 2027 पर्यंत हा डेटा सार्वजनिक होईल, अशी अपेक्षा आहे.
जनगणनेची काम जवळपास पेपरलेस असणार आहे. मोबाइल अॅप, पोर्टल आणि रियल टाइम डेटा ट्रान्सफरमुळे हे काम पेपरलेस होणार आहे. जीपीएस टॅगिंग आणि प्री-कोडेड ड्रॉपडाउन मॅन्यू व्यवस्थेमुळे कुठे चुका होण्याची शक्यता नाही.