AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Biometric : 8 नोव्हेंबरपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा बायोमेट्रिक हजेरी, कोरोना नियमांची सक्ती कायम

बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर असणं बंधनकारक असेल हे संबंधित विभाग प्रमुखांची जबाबदारी असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपली हजेरी लावण्यापूर्वी सॅनिटायझरने हात साफ करणं गरजेचं असणार आहे.

Biometric : 8 नोव्हेंबरपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा बायोमेट्रिक हजेरी, कोरोना नियमांची सक्ती कायम
बायोमेट्रिक हजेरी
| Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 02, 2021 | 7:31 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून सोमवारी याबाबत माहिती देण्यात आली. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मधल्या काळात बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात करण्यात आली होती. पण आता ती पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर असणं बंधनकारक असेल हे संबंधित विभाग प्रमुखांची जबाबदारी असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपली हजेरी लावण्यापूर्वी सॅनिटायझरने हात साफ करणं गरजेचं असणार आहे. (Biometric attendance for central government employees from November 8)

यापूर्वी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बायोमेट्रिक हजेरी लावण्यापासून सूट देण्यात आली होती. कार्मिक मंत्रालयाने केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय आणि विभागांना दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, बायोमेट्रिक मशीनवर आपली हजेरी लावताना प्रत्येक कर्मचाऱ्याने आपसांत 6 फुटाचं अंतर राखणं गरजेचं आहे. जर एखाद्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असेल आणि हजेरीसाठी गर्दी होत असेल तर अतिरिक्त बायोमेट्रिक मशीन लावण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक

बायोमेट्रिक मशीनच्या सूचनेसह अजून एक महत्वाची सूचना देण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व ठिकाणी तोंडाला मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर शक्य असल्यास सर्व बैठका या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाव्यात. अनोळखी व्यक्तीसोबत बैठक करणे टाळा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी कोरोनाशी संबंधित सर्व नियम पाळण्याचा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

कोरोनापासून बचावासाठी बायोमेट्रिक होते बंद

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च 2020 पासून बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची रजिस्तरवर हस्ताक्षर करुन हजेरी घेतली जात होती. जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका असलेल्या सर्वच वस्तू किंवा घटकापासून लांब राहण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, 2014 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्रालय आणि सरकारी विभागात बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. वेळ आणि कामाची शिस्त लावण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयाचं तेव्हा जोरदार स्वागत करण्यात आलं होतं.

इतर बातम्या :

Gold Rate Today: धनत्रयोदशीपूर्वीच मोठी बातमी! सोने स्वस्त; तोळ्याचा भाव काय?

मोठी बातमी ! देशात उघडली आणखी एक नवी बँक, अधिक व्याजासह ‘या’ सुविधा घरबसल्या मिळणार

Biometric attendance for central government employees from November 8

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...