युद्धाची तयारी? भारतीय संरक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय, पाकिस्तानची झोप उडाली

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे, याचदरम्यान भारतानं आता मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे.

युद्धाची तयारी? भारतीय संरक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय, पाकिस्तानची झोप उडाली
india-pakistan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2025 | 7:43 PM

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आली असून, अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढंच नाही तर आयात -निर्यात देखील पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे, याचदरम्यान भारतानं आता मोठा निर्णय घेतला आहे. भारतानं शॉर्ट रेंज डिफेंस मिसाइल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एअर डिफेंस प्रणाली आणखी मजबूत होणार आहे. भारत 85 डिफेंस मिसाइल, 48 लॉचंर आणि 48 नाइट व्हिजन साइटची देखील खरेदी करणार आहे.

भारतीय लष्कराने हवाई संरक्षणासाठी नेक्स्ट जनरेशन एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या अंतर्गत, संरक्षण मंत्रालयाकडून 48 लाँचर्स, 48 नाईट व्हिजन साइट्स, 85 क्षेपणास्त्रे आणि 1 क्षेपणास्त्र चाचणी केंद्र खरेदी करण्यासाठी आरएफपी जारी करण्यात आला आहे. ही नेक्स्ट जनरेशन एअर डिफेन्स सिस्टिम दिवसा, रात्री केणत्याही वातावरणात शत्रूंचा खात्मा करू शकते.

एवढंच नाही तर ही क्षेपणास्त्र प्रणाली उंचावरील प्रदेश, मैदानी प्रदेश, वाळवंट, किनारी प्रदेश तसेच समुद्री भागात देखील प्रभावीपणे काम करणार आहे, या मिसाईलची रेंज कमीत -कमी पाचशे ते जास्तीत जास्त सहा हजार मीटर एवढी असल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. भारतानं हा निर्णय अशा परिस्थितीमध्ये घेतला आहे, ज्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. या निर्णयामुळे आता पाकिस्तानची झोप उडणार आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून वारंवार विखारी वक्तव्य केली जात आहेत. युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.