AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठा निर्णय! 100% टॅरिफला भारताचा थेट इशारा, गरज पडली तर…

अमेरिकेच्या 100 टक्के टॅरिफच्या प्रकरणावर भारताने कठोर प्रतिक्रिया दिली आहे. आता परराष्ट्र मंत्रालयाने नेमका काय निर्णय घेतला आहे? जाणून घ्या...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठा निर्णय! 100% टॅरिफला भारताचा थेट इशारा, गरज पडली तर...
Modi and TrumpImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 11:03 AM
Share

भारत सरकारने अमेरिकेच्या संसदेत रशिया आणि इराणवर नवीन निर्बंध असलेला कायदा मंजूर झाल्याची दखल घेतली आहे. भारताने म्हटले आहे की, तो या प्रकरणातील पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, देशाच्या १४० कोटींहून अधिक लोकसंख्येच्या ऊर्जा गरजा पूर्ण करणे ही त्याची प्राथमिकता आहे. अमेरिका नवीन कायद्याद्वारे भारतावर १०० टक्के टॅरिफ लावण्याची तयारी करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (१७ सप्टेंबर) यावर प्रतिक्रिया दिली.

परराष्ट्र मंत्रालयाने यावर म्हटले आहे की, ‘भारत आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी वेगवेगळ्या देशांकडून तेल आणि गॅस खरेदी करणे सुरू ठेवेल. तसेच बाजारातील बदलांनुसार निर्णय घेईल. भारताने म्हटले की, या मुद्द्यावर अलीकडच्या महिन्यांत अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत उच्च स्तरावर चर्चा झाली आहे.’ भारताने अमेरिकेला हेही सांगितले आहे की, या निर्बंधांचा परिणाम फक्त भारत-अमेरिका संबंधांवरच नव्हे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारावरही होऊ शकतो. भारताने म्हटले आहे की, तो आपल्या व्यापार आणि आर्थिक हितसंबंधांच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलेल.

भारताने रशियन तेलाबाबत काय संदेश दिला?

निवेदनात म्हटले, ‘सरकार भारतीय व्यापार आणि उद्योग संघटनांसोबत मिळून या नवीन घडामोडींच्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्याची तयारी करेल. भारताचा संदेश असा आहे की, रशियाकडून तेल खरेदीसह त्याच्या ऊर्जा सुरक्षेसंबंधी निर्णय त्याच्या स्वतःच्या हितसंबंधांनुसार आणि बाजारातील परिस्थिती पाहून घेतले जातील.’

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर दबाव आणत आहे अमेरिका

अमेरिकन संसदेत रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ लावणारे बिल मंजूर झाले आहे. हा कायदा राष्ट्रपती ट्रम्प यांच्या सहीनंतर लागू होईल. भारत आणि चीनसह अनेक देश रशियाकडून तेल खरेदी करतात. यूएसमध्ये नवीन कायदा मंजूर झाल्यानंतर ट्रम्प यांना १०० टक्के टॅरिफ लावण्याचा अधिकार मिळाला आहे. भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून दीर्घकाळापासून आपल्या ऊर्जा गरजा पूर्ण करत आला आहे, पण आता याच तेल खरेदीबाबत अमेरिकेने भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...