
भारताच्या संरक्षण धोरणात आता मोठा बदल होणार आहे.आतापर्यंतचा डिफेन्स टेक्नॉलॉजीतील आत्मनिर्भरता आणि रिजनल डॉमिनेशनपर्यंत मर्यादित दृष्टीकोण सोडून भारत आता इंटरकॉन्टीनेंटल पॉवर प्रोजेक्शनच्या दिशेने चालला आहे. याचे उदाहरण आहे भारतीय वायू सेनेचे प्रस्तावित अल्ट्रा लाँग रेंज स्ट्रॅटजिक बॉम्बर विमान. याचा पल्ला तब्बल १२ हजार किलोमीटरचा असणार आहे.म्हणजे हे बॉम्बर भारतातून उड्डाण घेत अमेरिकेतील शहरावर देखील बॉम्ब ठाकू शकते. हा केवल कल्पना विलास नाही तर वास्तवात असे विमान तयार होत आहे. हे विमान अमेरिकन B-21 आणि रशियाच्या TU-160 बॉम्बर्स विमानांच्या धर्तीचे असणार आहे.
आता जगात युद्धाची रित बदलली आहे. आताचे युद्ध केवळ फ्रंटलाईनवर लढल जात नाही.तर सायबर, स्पेस आणि लांबपल्ल्याच्या एअर स्ट्राईकद्वारे लढले जात आहे. चीनने H-20 स्ट्रॅटजिक बॉम्बरच्या दिशेने मोठी प्रगती केली आहे. अमेरिका देखील खूप काळापासून B-2 स्पिरिट आणि आता B-21 रेडर द्वारे जगभरात शक्तीचे प्रदर्शन करीत आहे.
भारताची न्युक्लिअर ट्रायड आधीपासून मिसाईल आणि सबमरीनद्वारे सक्षम होती. परंतू आता एक स्ट्रॅटजिक एअरबॉर्न प्लॅटफॉर्म म्हणजे असे बॉम्बर जे कोणत्याही वेळी, किती लांबच्या शत्रूवर सर्जिकल वा न्युक्लिअर स्ट्राईक करु त्यांना कायमच धडा शिकवू शकेल.हा भारताच्या डिटरेंसना एक नवा आयाम देईल.
रशियाच्या TU-160 ब्लॅकजॅक जगातील सर्वात वेगवान आणि सर्वात वजनी सुपरसॉनिक स्ट्रॅटजिक बॉम्बर विमान आहे.याची रेंज १२ हजार किमी आहे.आणि हे ४० टनाचे शस्रास्र वाहून घेऊन जाऊ शकते. भारतीय संशोधक आणि डीआरडीओचे इंजिनियर यास रिजनल मॉडेलच्या रुपात तयार करीत आहेत. या विमानाला असे डिझाईल केले जात आहे की टेक्नॉलॉजी आणि रेंजमध्ये भारताच्या भू-राजकीय लक्ष्यानुरुपत ते तयार केले जात आहे.
अमेरिकेचे B-21 रेडर सध्या डेव्हलमेंट स्टेजमध्ये आहे. परंतू त्याची रेंज सुमारे ९,३०० किमी म्हटली जात आहे. भारताच्या प्रस्तावित बॉम्बरची रेंज त्याहून जादा असू शकते. ज्यामुळे थेट अमेरिका, युरोप,ऑस्ट्रेलिया आणि आफ्रीकेच्या कोणत्याही भागात ऑपरेट करता येऊ शकेल.स्टील्थ डिझाईन, रडार अवॉइडेंस, आणि ऑटोमेटेड नेव्हीगेशन सिस्टम…यामुळे हे विमान जागतिक स्तरावरचे होणार आहे.
या बॉम्बरची खास बात म्हणजे याची वेपन लोडिंग. सध्या प्लानिंगमुळे यात ब्रह्मोस-NG ला एक साथ चार युनिट फिट केले जाऊ शकतात.म्हणजेच ब्रह्मोस सारखे 290-450 KM रेजची सुपरसॉनिक मिसाईल्स तसेच अग्नि 1P सारखे शॉर्ट-रेंजची बॅलिस्टिक वेपन, लेझर गायडेड बॉम्ब आणि एंटी-रेडिएशन मिसाईल्स देखील असणार आहेत.
DRDO, HAL आणि ADA (एअरक्राफ्ट डेव्हलपमेंट एजन्सी) या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करीत आहेत.भारत सरकार रशिया वा फ्रान्सच्या कंपन्याशी देखील तंत्रज्ञानासाठी करार करु शकतो. या विमानाला विशेष टर्बोफॅन इंजिनाची गरज लागणार आहे. ज्यास भारत GE-414 इंजिनाची संशोधित आवृत्ती वा रशियाच्या NK-32 इंजिनसारख्या शैलीत विकसित करु शकतो.
संरक्षण मंत्रालय आणि एअरफोर्सने या प्रोजेक्टला ‘Ultra Long-Range Strike Aircraft’ अर्थात ULRA असे नाव दिले आहे. सध्या हे जेट फायटर विमान संकल्पना आणि डिझाईनच्या पातळीवर आहे, परंतु प्रारंभिक संशोधन आणि डमी मॉडेल्सवर काम आधीच सुरू झाले आहे. असे मानले जाते की त्याचा पहिला प्रोटोटाईप २०३२-२०३५ दरम्यान उडू शकेल.