ऑपरेशन सिंदूर : भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला उपरती,आता तुर्कीसोबत ड्रोन डीलमध्ये केला हा बदल
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने भारताच्या विरोधात तुर्कीचे ड्रोन वापरले होते. परंतू भारताने त्या सर्व ड्रोनना हवेतच नष्ट केल्याने आता पाकिस्तानला उपरती झाली आहे. आता तुर्कीच्या ड्रोनची चौकशी सुरु झाली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ९ अतिरेकी अड्डे नष्ट केले. तसेच पाकिस्तान केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ल्याना देखील भारताने यशस्वीपणे एअर डिफेन्सद्वारे परतवून लावले. या सैन्य संघर्षात पाकिस्तानने तुर्की निर्मित ड्रोनचा वापर केला होता. परंतू भारतीय डिफेन्स सिस्टीमपुढे त्यांचाही काही निभाव लागला नाही.आता पाकिस्तान आणि तुर्की दरम्यान होणाऱ्या ९०० दशलक्ष डॉलरच्या सौद्यावर याचा परिणाम होणार आहे.
तुर्कीकडून पुन्हा ड्रोनची मागणी
पाकिस्तानने आता चांगल्या क्वालिटीच्या ड्रोनसाठी तुर्कीची वाट धरली आहे. कारण ऑपरेशन सिंदुर दरम्यान तुर्कीचे ड्रोन फेल गेले होते. पाकिस्तान आणि तुर्कीत आता एडव्हान्स ड्रोन आणि नव्या कराराचा आधार घेत आपली सैनिक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी त्यांची ड्रोन आणि शस्रास्र क्षमता वाढवण्यासाठी पुन्हा एकदा भेट घेतली आहे. तुर्की ड्रोन निर्माता बायकर यांनी अलिकडेच केमानकेश 1, एक एआय -संचालित मिनी स्मार्ट क्रुझ मिसाईलचे यशस्वी लाईव्ह -फायर टेस्ट केले आहे. तुर्कीने यातून अचूक स्ट्राईक क्षमतेचा विस्तार केल्याचा दावा केला आहे.
ड्रोन फेल्युअरचा तपास सुरु
बायरकटार AKINCI ड्रोनने सुसज्ज मिसाईलने तुर्कीच्या तेकिरदाग आणि एडिरने प्रांतात आयोजित टेस्ट मिशनच्या एका सिरीज दरम्यान हवाई आणि जमीनीवर दोन्ही टार्गेटना उद्धवस्त करुन आपली लडाऊ क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. बायरकटार टीबी२ ड्रोनने अचूक हल्ल्याचे फूटेजना कैद केले आहे.त्यामुळे युद्धाच्या परिस्थितीत मिसाईलची अचूकता आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने भारताच्या विरोधात तुर्कीच्या YIHA ड्रोनचा वापर केला होता. या ड्रोनना भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने संपूर्णपणे नष्ट केले होते. आता तुर्कीने पाकिस्तानात त्यांच्या फेल गेलेल्या ड्रोनचा तपास सुरु केला आहे. यापैकी अनेक ड्रोन तुर्कीचे ऑपरेटर्स चालवत होते.
भारताविरोधात रचत आहेत साजिश
पाकिस्तानने आता त्यांचा टेहळणी आणि अचूक हल्ला करण्याच्या क्षमतेला वाढवण्यासाठी एडव्हान्स युएव्ही सिस्टीम खरेदी करण्याचा सौदा अंतिम टप्प्यात आणला आहे. तुर्की सोबत पाकिस्तानच्या या सौद्यात ‘कामिकेज़ ड्रोन’सारखे शस्रास्र सामील होतील. जुलैच्या सुरुवातीला इस्लामाबादच्या एका उच्चस्तरीय दौऱ्यात तुर्कीचे परराष्ट्रमंत्री हाकन फ़िदान आणि संरक्षण मंत्री यासर गुलर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर, आयएसआय लिडरशिप आणि उर्वरित टॉप डिफेन्स ऑफिशियलसोबत चर्चा केली होती.
गुप्त माहीतीनुसार या संयुक्त परिषदेत भारताच्या विरोधातील कटकारस्थांना हायलाईट करण्यासोबतच ऑपरेशनल इंटेलिजन्स शेअर करणे आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर जोर देण्यात आला आहे. सैन्यातील संतुलन राखण्यासाठी एडव्हान्स ड्रोन आणि ७०० लोईटरिंग तोफगोळे यांच्या करारासह पाकिस्तान आणि तुर्कीने २०२५ च्या अखेर पर्यंत द्विपक्षीय व्यापाराला ५ अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा संकल्प केला आहे.
