AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमध्ये राष्ट्राध्यक्षांना ठार करण्यासाठी गेले होते इस्राईलचे F-15, सहा मिसाईलही डागल्या, पायाला जखमही झाली,पण….

इराणवर इस्राईलच्या हल्ल्या दरम्यान एक F-15 फायटर जेटची इंधर टँक फेल झाला होता.हे विमान इराणच्या सीमेच्या आत पोहचल होते आणि इमर्जन्सी लँडींगची नौबत आली. परंतू हे जेट बालंबाल वाचले.या काळात इस्राईलने इराणच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचाही प्रयत्न केला

इराणमध्ये राष्ट्राध्यक्षांना ठार करण्यासाठी गेले होते इस्राईलचे  F-15, सहा मिसाईलही डागल्या, पायाला जखमही झाली,पण....
Israel air strikes
| Updated on: Jul 13, 2025 | 4:45 PM
Share

इराण आणि इस्राईल दरम्यान १२ दिवस घमासाम युद्ध झाल्यानंतर सीजफायर झालेला आहे. या युद्धात कोणाचाच विजय झालेला नाही. सीजफायरनंतर आता नवनवीन खुलासे होत आहेत. हे मध्य पूर्वेतील तणावात आणखीन वाढ करु शकतात. पहिला धक्कादायक खुलासा इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्ये संदर्भातील आहे. बातम्यानुसार १५ जून रोजी तेहराण येथे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेश्कियन, संसद अध्यक्ष आणि न्यायालयाचे प्रमुख एकसाथ ठार करण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्यात इराणी राष्ट्राध्यक्षाच्या पायाला छोटी दुखापतही झाली. तर अन्य अधिकारी इर्मजन्सी मार्गाने पळाल्याने वाचले. हा हल्ला इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटीच्या बैठकीला निशाना करण्यासाठी केला होता.

फार्स न्यूज एजन्सीच्या मते इस्राईली क्षेपणास्रांनी मिटींग हॉलच्या सर्व प्रवेश आणि निकास पॉईंटना ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सहा क्षेपणास्र वा बॉम्बचा वापर केला गेला होता. इमारतीच्या चारी बाजूंचा परिसर उद्धवस्त झाला.परंतू अधिकाऱ्यांनी आपात्कालिन बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याने त्यांचे प्राण थोडक्यात वाचल्याचे उघडकीस आले आहे.

अनेक प्रश्नांचा ससेमिरा

यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इस्राईलच्या या गुप्त बैठकीची माहीती इस्राईलला कशी मिळाली. इराणच्या नेतृत्वामध्ये कोणी गुप्तहेर तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. इराणची गुप्तहेर संस्था या संशयित बाबीचा तपास करीत आहे. बातम्यात म्हटले आहेत की हल्ला त्याच प्रकारचा होता ज्यात याआधी हेजबोल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला यांना बेरुत मध्ये ठार मारण्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष पेसेश्कियन यांनी हल्ल्यास दुजारो देताना सांगितले की हा त्यांनी प्रयत्न केला..परंतू ते अयशस्वी झाले.त्यांनी ही कबुली एका मुलाखतीत अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांच्याशी बोलताना दिली. इस्राईलवर त्यांनी यावेळी कोणतीही टीपण्णी केली नाही.

इस्राईलचे F-15 नांदुरुस्त झाले

दुसरी घटना इस्राईलच्या वायू सेनेशी संबंधित आहे. रविवारी आलेल्या एका बातमीनुसार इस्राईलच्या ऑपरेशन दरम्या इस्राईलचे एक एफ-15 फायटर जेट इराणच्या सीमेवर पोहचताच तांत्रिक समस्येने नादुरुस्त झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे या फायटरला जमीनीवर लँड करण्याची नौबत आली. हे विमान त्यावेळी इराणच्या सीमेत खुप दूर अंतरापर्यंत आत पोहचले होते. तेव्हा त्याच्या इंधन टाकीत गडबड झाली. इस्राईल चॅनल 12 च्या मते या विमानाच्या पायलटने कंट्रोल मिशनला या संदर्भात सतर्कही केले.त्यावेळी कोणतेही रिफ्युलिंग एअर क्राफ्ट सोबत नव्हते. त्यावेळी तातडीने मदतीला पर्यायी विमान पाठविण्याची योजना आखण्यात आली.

 या देशाचे नाव उघड करण्यात आलेले नाही

परिस्थिती अशी झाली की एक बॅकअप प्लान देखील तयार ठेवण्यात आला. जर इंधन घेऊन जाणारे विमान वेळेत पोहचले नाही तर F-15 ला कोणत्या तरी शेजारी देशात लँडिंग करण्याची तयारी करण्यात आली. या देशाचे नाव  इस्राईलकडून उघड करण्यात आलेले नाही. परंतू नशिबाने इंधन घेऊन मदतीला जाणारे विमान त्या नादुरुस्त विमानाच्या मदतीला पोहचले. आणि पायलटला इंधन भरुन देऊन मिशन पूर्ण झाले. या घटनेत कोणत्याही जिवितहानीची बातमी जाहीर करण्यात आलेली नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.