
Cloud Burst : पावसाने राज्यातच नाही तर देशभरात धुमाकूळ घातला आहे. जम्मू-काश्मीरपासून ते खालच्या टोकापर्यंत आणि गुजरातपासून ते पार पश्चिम बंगालपर्यंत पावसाने थैमान घातले आहे. पाऊस नुसता मोकाट सुटलाय. या मुसळधार पावसानं दोन महिन्यांपासून चाकरमान्यांना, शेतकऱ्यांना आणि शेतीला वेठीस धरलं आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. अनेकांचं संसार उद्धवस्त झालं आहे. शेतीचं तर मोठं नुकसान झालं आहे. नदी,ओढ्या काठच्या जमिनी गिळंकृत झाल्या आहेत. तर लाखो हेक्टरवरील जमीन खरडून निघाल्या आहेत. खरीपाचं पीक हातचं गेलं आहे. सगळी पिकं पाण्यात आहेत. शेतीचा तलाव झाला आहे. कापसासह सोयाबीन,मूग,उडीद आणि इतर अनेक पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेतात पंचनामे करणं सुद्धा अवघड झालं आहे. पावसाचे हे उग्र रुप कित्येक वर्षानंतर दिसले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं आहे. हवामान, पर्यावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. मुसळधार...