पहिला झटका, इकडे इंडिया आघाडीची रॅली, तिकडे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये पोलिसांची धडक, काय घडलं?

दिल्लीत इंडिया आघाडीच्या विराट रॅलीत शक्ती प्रदर्शन सुरू असताना, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी पाटणा येथील काँग्रेस कार्यालयावर धडक दिली. पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी काँग्रेस आयटी सेल सदस्य अमित कुमार मंडल यांच्या विरोधात ही कारवाई होती.

पहिला झटका, इकडे इंडिया आघाडीची रॅली, तिकडे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये पोलिसांची धडक, काय घडलं?
Delhi Police
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2026 | 10:58 PM

काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने आज रविवारा दिल्लीच्या रामलीला मैदानावर प्रचंड रॅली काढली. वोट बचाओ, देश बचाओ महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत प्रचंड मोठा जनसमुदाय लोटला होता. या रॅलीच्या निमित्ताने विरोधक शक्ती प्रदर्शन करण्यात यशस्वी ठरले आहेत. या रॅलीमुळे सत्ताधारी गोटात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, ही रॅली इकडे होत असतानाच पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यालयावर धडक दिली आहे. काँग्रेसचं कार्यालय सदाकत आश्रममध्ये दिल्ली पोलिसांनी स्थानिक पाटलीपुत्र पोलीस ठाण्याच्या मदतीने धडक दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा एआय व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. दिल्ली पोलीस अमित कुमार मंडल यांचा शोध घेत होती. अमित मंडल सापडले नाही. तसेच त्यांच्या भावाने नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे पाटण्याच्या काँग्रेस कार्यालयावर दिल्ली पोलिसांनी नोटीस चिपकवली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा एक व्हिडीओ एआयद्वारे करण्यात आला होता. त्याविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासानिमित्ताने दिल्ली पोलीस पाटण्याला पोहोचले होते. त्यावळी अमित मंडल हे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या आयटी सेलमध्ये होते. पोलिसांनी आश्रम परिसरात गेल्यावर अमित कुमार मंडल यांच्याबद्दलची माहिती घेतली. अमित कुमार हे आश्रम परिसरात बनलेल्या क्वॉर्टरमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच दिल्लीतील इंडिया आघाडीच्या रॅलीत भाग घेण्यासाठी ते दिल्लीला आले होते. पोलिसांनी त्यांच्या भावाची चौकशी केली आणि नोटीस स्वीकारण्यास सांगितलं होतं.

Loading...

नोटिस स्वीकारण्यास नकार

अमित कुमार मंडल यांच्या भावाने नोटीस स्वीकारण्यास मनाई केली होती. तेव्हा पोलिसांनी काँग्रेसच्या मुख्यालयाच्या नोटीस बोर्डवर नोटीस चिपकवली होती. त्याचा फोटो काढून पोलीस परत आले होते. या नोटिशीत अमितक कुमार यांना 5 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रमन मार्गावरील एसीपी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यात एआयद्वारे तयार करण्यात आलेल्या मोबाईलचा नंबर या नोटिशीमध्ये छापण्यात आला असून या नंबरवरून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओची माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे.

गेल्या वर्षीचं प्रकरण

हे प्रकरण बिहार विधानसभा निवडणूक 2025चं आहे. काँग्रेसच्या एक्स हँडलवरून एक एआय जनरेटेड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई त्यांना काम करण्याचा सल्ला देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पब्लिक डोमेनमध्ये टाकण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अॅक्शन घेतली आहे. पोलिसांनी अमित मंडल यांना समन्स बाजवून 5 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us