Weather update : देशावर मोठं संकट… पुढचे 5-6 दिवस धोक्याचे… महाराष्ट्रातही…
भारतावर अल निनोमुळे कोरड्या दुष्काळाचे, तर अर्नब चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचे दुहेरी संकट आहे. IMD ने बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवली आहे. 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा येथे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

भारताच्या अनेक भागात हवामानात प्रचंड बदल होताना दिसत आहे. भारत हवामान विभागाने (IMD) देशावर यावेळी दोन मोठी संकटं असल्याचं म्हटलं आहे. पहिलं संकट अल-निनोचं आणि दुसरं संकट अर्नब सायक्लोनचं असल्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. प्रशांत महासागरात अल निनो मजबूत झाल्याने देशात कोरडा दुष्काळ पडण्याची गंभीर शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा स्ट्राँग होऊन त्याचे रुपांतर डीप डिप्रेशनमध्ये झालं तर भारताच्या अनेक राज्यात अर्नब चक्रीवादळ येऊ शकतं, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढचे पाच सहा दिवस देशाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे देशाच्या अनेक भागात येत्या 5-6 दिवसात जोरदार पाऊस होणार आहे. अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा येत्या दोन दिवसात अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे 21 सप्टेंबरपर्यंत डिप्रेशन आणि 22 सप्टेंबर रोजी डीप डिप्रेशनमध्ये त्याचं रुपांतर होण्याची शक्यता आहे. 23 सप्टेंबरपर्यंत ते आंध्र प्रदेश-दक्षिण ओडिशाच्या तटाच्याजवळच्या पश्चिम-मध्य आणि त्याला लागून असलेल्या उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत पोहोचू शकतो, असं आयएमडीने म्हटलं आहे.
किनाऱ्या लगतच्या राज्यांमध्ये पाऊस
दक्षिण ओडिशा आणि उत्तर किनाऱ्यावरील आंध्र प्रदेशात 23-24 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण छत्तीसगडमध्ये 24 सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो. छत्तीसगड आणि तेलंगणात 23 ते 25 सप्टेंबर आणि महाराष्ट्रातील विदर्भात 24 आणि 25 सप्टेंबर रोजी प्रचंड पाऊस होण्याची शक्यता आहे, असं आयएमडीने स्पष्ट केलं आहे.
आयएमडीचा अलर्ट जारी
आयएमडीने ओडिशा आणि उत्तर किनाऱ्यावरील आंध्र प्रदेशाच्या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोन्ही क्षेत्रांमध्ये 23-24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिशात 23-24 सप्टेंबर रोजी 50-60 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. वाऱ्याचा स्पीड 70 किलोमीटर प्रति ताशी पोहोचण्याची शक्यता आहे. 23 सप्टेंबर रोजी दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशातील किनाऱ्याच्या आसपास 55-56 किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. दक्षिण आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर 23-24 सप्टेंबर रोजी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
अति मुसळधार पावसाची शक्यता
पूर्व भारतात अंदमान निकोबार बेटांचा समूह आणि पश्चिम बंगालमध्ये 20 ते 26 सप्टेंबरच्या दरम्यान प्रचंड पाऊस होण्याची शक्यता आहे. झारखंड, ओडिशा आणि उप-हिमालयाच्या पश्चिम बंगाल-सिक्कीममध्ये 22 ते 26 सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. बिहारमध्ये 24-26 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या गंगा किनाऱ्यावरील भागात 22 ते 25 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.