आसाममध्ये लष्काराची कमाल; महामार्गावर बांधलेल्या हवाई पट्टीवर उतरले पंतप्रधानांचे विमान

PM Narendra Modi Air Force : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामध्ये भारताचा पहिली आपत्कालीन विमान उतरवण्याच्या सुविधेचे (ELF) उद्धघाटन केले. मोरन बायपासवरील महामार्गावर बांधलेल्या हवाई पट्टीवर त्यांचे C-130 विमान उतरले. ही सुविधा लष्करासाठी आणि नागरिकांसाठी अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आसाममध्ये लष्काराची कमाल; महामार्गावर बांधलेल्या हवाई पट्टीवर उतरले पंतप्रधानांचे विमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Feb 14, 2026 | 1:39 PM

PM Narendra Modi Plane lands on Airstrip on Highway: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या एकदिवशीय दौऱ्यावर पोहचले. शनिवारी मोरन येथे इमरजेन्सी लँडिंग फँसेलिटीचे (ELF) त्यांनी उद्धघाटन केले. यासह त्यांनी या भागातील 5,500 कोटींच्या विविध योजनांची सुरुवात केली. पंतप्रधान मोदींचे चाबुवा हवाई क्षेत्रात आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींचे विमान सी-130 हे महामार्गावर तयार करण्यात आलेल्या धावपट्टीवर उतरवण्यात आले. हे विमान पहिल्यांदा महामार्गावर उतरवले गेले. तर येथे जवळपास 40 मिनिटांचा वायुदलाने एअर शो पण केला. यावेळी वायुदलाच्या लढाऊ विमानांनी आकाशात चार चांद लावले.

महामार्गावर उतरवले विमान

पंतप्रधान अगोदर चाबुआ येथे पोहचले. तिथे C-130 मध्ये बसून ते मोरन इथं पोहचले.मोरन येथे महामार्गावर तयार करण्यात आलेल्या धावपट्टीवर त्यांचे विमान उतरले. मोरन एयरस्ट्रिप NH-127 च्या 4.4 किमी लांब तयार करण्यात आलेल्या धावपट्टीवर ELF तयार करण्यात आली आहे. ही भारताची पहिली इमरजेन्सी लँडिंग फॅसिलिटी (ELF) आहे. यामुळे लष्करी आणि नागरिकांसाठीच्या विमानांना उतरता येईल. पंतप्रधानांचे विमान सुद्धा इथं उतरवण्यात आले.

सुखाई-30 उतरले धावपट्टीवर

या कार्यक्रमात सर्वात अगोदर एक राफेल आणि एक सुखोई-30 धावपट्टीवर उतरवण्यात आले. यानंतर वायुदलाने डॉर्नियर विमानाने या धावपट्टीवरून उड्डाण केले. त्यानंतर C-130J ची लँडिंग केले. तर त्यानंतर सुखोई आणि राफेल यांनी एकानंतर एक असे उड्डाण केले. तीन सुखोई लढाऊ विमान मंचासमोरून झेपावले. त्यांनी टच अँड गो ड्रिल करून दाखवली. त्यानंतर तीन राफेल विमानांनी सुद्धा फार्मेशन ड्रिल केली.

इमरजन्सी लँडिंग सुविधेचा फायदा काय?

भविष्यात टू फ्रंट वॉरचे आव्हान असताना भारतीय वायुदल त्यासाठी जोरदार तयारी करत आहे. देशातील विविध भागात हायवेवर, महामार्गावर विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे लढाऊ आणि वाहतूक विमानांना इथं उतरता येईल. हा रनवे त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल. ही योजना केंद्र सरकार, रस्ते वाहतूक मंत्रालय आणि भारतीय वायुदलाच्या संयुक्त उपक्रमातून तयार करण्यात आली आहे. या नवीन दमदार पावलामुळे भारताच्या पूर्वोत्तर राज्याशी संपर्क वाढणार आहे. तर चीन आणि बांगलादेशाला हा मोठा शह मानल्या जात आहे.