Pakistan Attack Jammu : पाकिस्तानला मोठा झटका, दोन JF- 17, एक F-16 पाडलं

Pakistan Attack Jammu : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. पण याचा त्यांनाचा फटका बसला आहे. जम्मूमध्ये पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाइलने हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या Action मध्ये पाकिस्तानची काही फायटर जेट्स सुद्धा पाडण्यात आल्याची माहिती आहे.

Pakistan Attack Jammu : पाकिस्तानला मोठा झटका, दोन JF- 17, एक F-16 पाडलं
India-Pakistan War
| Updated on: May 09, 2025 | 2:25 PM

पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे दोन JF- 17 आणि F-16 फायटर जेट पाडल्याची माहिती आहे. पाकिस्तानने काल रात्री भारताच्या 15 शहरांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न भारताने यशस्वी होऊ दिला नाही. S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तान हवाई हल्ला परतवून लावला. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मूमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सुद्धा भारताच्या सैन्यदलाने यशस्वी होऊ दिलेला नाही. पाकिस्तानने डागलेली ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच नष्ट करण्यात आली आहेत. भारतीय एअर डिफेंस सिस्टिमने जम्मू, जैसलमेर आणि अमृतसर येथे पाकिस्तानचे हल्ले अयशस्वी केले आहेत. एअर डिफेन्स सिस्टिमसह एअर डिफेन्स गनने सुद्धा जम्मूत कमी उंचीवरुन उड्डणाऱ्या ड्रोन्सना नष्ट केलं.

जम्मूचा सतवारी एअरपोर्ट, जम्मू यूनिवर्सिटी टार्गेट करण्यासाठी पाकिस्तानने ड्रोन्स डागली होती. पण त्यांना अँटी ड्रोन सिस्टिमद्वारे नष्ट करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. घरातील कोणत्याही लाइट चालू करु नका. वाहनांची रस्त्यावरील हालचाल थांबवा. घराबाहेर पडू नका, असं जम्मू काश्मीर सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे.

एअरस्ट्रिपवर रॉकेट डागण्याचा प्रयत्न

पंजाबच्या बॉर्डर भागा ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. अमृतसरमध्ये रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॅकआऊट असणार आहे. पाकिस्तानने गुरुवारी जम्मू येथील एअरस्ट्रिपवर रॉकेट डागले. पण भारतीय सैन्याची सतर्कता आणि ताकतवर एअर डिफेन्स प्रणालीने पाकिस्तानचा हा हल्ला यशस्वी होऊ दिला नाही.


8 मिसाईल्स हवेतच नष्ट

भारतीय सैन्याच्या अत्याधुनिक S-400 मिसाइल डिफेंस सिस्टिमने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली 8 मिसाईल्स हवेतच नष्ट केली. जम्मू एअरस्ट्रिप या मिसाईल्सच लक्ष्य होतं. पण वेळीच कारवाई करुन पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला.

सैन्य पूर्णपणे सज्ज

भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने पाकिस्तानच F-16 फायटर जेट पाडलं आहे. नियंत्रण रेषेजवळ ही कारवाई केली आहे. पाकिस्तानी जेट भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करताच ते विमान पाडण्यात आलं. देशाच्या सुरक्षेशी कसलीही तडजोड करणार नाही, असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं आहे. सैन्य प्रत्येक स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.