भारतीय नागरिक असलेल्या जहाजाचं अपहरण, मोठी खळबळ, थेट…
मोठी बातमी समोर येत आहे, सहा भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजाचं अपहरण करण्यात आलं आहे. सोमालियाच्या किनारपट्टी भागातून या जहाजाचं अपहरण करण्यात आलं आहे, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून अजूनही वाहतूक सुरळीत झालेली नाही, त्यामुळे जे देश कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहेत, त्यांना याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढलेला असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. समुद्री चाचांनी सोमालियाच्या किनार पट्टीवरून एका जहाजाचं अपहरण केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या जहाजावर एकूण 10 क्रू मेंबर होते, त्यापैकी 6 क्रू मेंबर्स हे भारतीय आहेत. या घटनेबाबत माहिती देताना सोमालियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, समुद्री चाचांनी एका जहाजाचं अपहरण केलं आहे, ते या जहाजाला नुगाल समुद्र किनाऱ्याकडे घेऊन गेले आहेत, या जहाजामध्ये तुर्कस्तानचा शस्त्रसाठा होता.
एका वृत्तवाहिनीला बोलताना सोमालियाच्या अधिकाऱ्याने म्हटलं की, या जहाजाचं सोमवारी पुटलँड पासून जवळपास 3.5 नॉटिकल मैल दूर अंतरावर समुद्री चाचांनी अपहरण केलं आहे. ते या जहाजाला नुगाल समुद्र किनाऱ्याकडे घेऊन गेले आहेत. हे जहाज पोलर मुव्हमेंट शिपिंगच्या मालकीचं असून, या जहाजामधून तुर्कीच्या शस्त्रांची वाहतूक करण्यात येत होती. मोगादिशूमध्ये तुर्कीचं मिलिट्री ट्रेनिंग सेंटर आहे, तिकडेच शस्त्रसाठा घेऊन हे जहाज निघालं होतं. मात्र वाटेतच या जहाजाचं अपहरण करण्यात आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या जहाजांमध्ये एकूण दहा जण आहेत, त्यातील सहा हे भारतीय नागरिक आहेत, तर एक तुर्की, एक जॉर्जिया आणि दोन सर्बियाच्या नागरिकांचा समावेश आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आठ समुद्री चाचांनी या जहाजाचं अपहरण केलं आहे. यापूर्वी देखील त्यांनी 26 एप्रिल रोजी एका जहाजाचं अपहरण केलं होतं, आता जहाजाचं अपहरण करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे, जहाजाचं अपहरण होताच आता तुर्कस्थान अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.