
इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि मोठी राख बाहेर पडली. सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये या राखेचे ढग आहेत. या राखेमुळे वातावरण पूर्णपणे बदलले असून राखेचे कण वातावरणात बघायला मिळत आहेत. इथिओपियातून समुद्री मार्गाने राखेचे मोठे ढग भारतात पोहोचले. यानंतर याचा गंभीर परिणाम देशातील विमान सेवेवर झाला. अनेक विमान कंपन्यांनी विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. आकाशात राखेचे कण दिसत आहेत. भारतीय विमान कंपन्यांनी थेट सध्याच्या परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष असून प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच या राखेच्या ढगांबद्दल अत्यंत मोठे अपडेट दिले आहे. राखेचे हे ढग आता पूर्वेकडे चीनकडे सरकत आहेत, असे त्यांनी म्हटले.
ज्वालामुखीच्या राखेचे ढग पुढे चीनकडे सरकत आहेत. मात्र, भारतावर अजूनही संकट कायम आहे. भारतीय हवाई क्षेत्रावरील त्याचा प्रभाव कमी होत आहे. ज्वालामुखीच्या राखेचे ढग राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाबमध्ये दिसत आहेत. दिल्लीमध्ये अत्यंत गंभीर परिणाम दिसत असून वायू प्रदूषण प्रचंड वाढले आहे. दिल्लीतून उड्ढाण होणाऱ्या अनेक फ्लाईट रद्द करण्यात आल्या.
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्वालामुखीच्या राखेचे ढग भारतापासून पुढे चीनकडे हळूहळू सरकत आहेत. आज सायंकाळी 7.30 पर्यंत सर्वकाही पूर्वीसारखे होईल आणि ज्वालामुखीच्या राखेचे पूर्ण ढग भारतातून बाहेर जातील. बाकी सॅटलाईटच्या मदतीने परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवले जाईल. 10,000 वर्षांपासून हा ज्वालामुखी शांत होता. मात्र, अचानक त्याचा मोठा उद्रेक झाला. ज्वालामुखीच्या उद्रेकाची राख आणि सल्फर डायऑक्साइडचे दाट ढग 14 किलोमीटर उंचीवर गेले.
Update06:
The Ash plume mostly consists of Sulphur Dioxide with low to moderate concentrations of Volcanic Ash. Its now stretching from Oman-Arabian sea region into Plains of North & Central India. Its will not impact AQI levels but it will impact So2 level at #Hills of #Nepal,… https://t.co/f95r95mLMi pic.twitter.com/WQOOhKmyHM— IndiaMetSky Weather (@indiametsky) November 24, 2025
जोरदार वाऱ्यांमुळे राखेचे ढग वेगाने वायव्य भारताकडे सरकले. या परिस्थितीनंतर, देशभरातील अनेक विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आले आणि काही विमानांचे मार्ग बदलावे लागले. परिस्थितीवर भारतीय हवामान विभागाचे बारीक लक्ष असल्याचीही माहिती मिळत आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा फटका भारतात बसल्याचे स्पष्ट आहे.