रेल्वेचा महत्वाचा निर्णय, IRCTC ची ही खाती ब्लॉक होणार, तुम्ही करुन घ्या हे काम

भारतीय रेल्वेकडून आयआरसीटीसी खात्यासंदर्भात महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच तिकीट बुकींगसाठी होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यासाठी आयआरसीटीसी अकाउंटचे व्हेरिफेकेशन करावे लागणार आहे.

रेल्वेचा महत्वाचा निर्णय, IRCTC ची ही खाती ब्लॉक होणार, तुम्ही करुन घ्या हे काम
रेल्वे
| Updated on: Jun 05, 2025 | 8:40 AM

IRCTC Tatkal Ticket Booking New Rule: भारतीय रेल्वेने तिकीट बुकींगसाठी होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी आयआरसीटीसी अकाउंटचे व्हेरिफेकेशन करावे लागणार आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करुन एजंटांकडून अनधिकृतपणे करण्यात येणारे तिकीट बुकींग रोखण्यात येणार आहे. लवकरच तत्काल तिकीटासाठी ई-आधार ऑथेंटिकेशन गरजेचे असणार आहे. आयआरसीटीसीने मागील सहा महिन्यांत २४ दक्षलक्ष जास्त खाती डीएक्टिव्हेट किंवा ब्लॉक केले आहेत.

IRCTC वेबसाइटवर १३० दक्षलक्षापेक्षा जास्त खाती आहेत. त्यातील केवळ १२ दक्षलक्ष खाती आधारने व्हेरिफाईड करण्यात आली आहे. आता आयआरसीटीसीने सर्व खात्यांचे स्पेशल व्हेरिफिकेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात संशयास्पद आढळणारी खाती बंद केली जाणार आहे.

पहिल्या दहा मिनिटांत प्राधान्य

आधारने लिंक करणाऱ्या युजर्सला तत्काळ तिकीट बुकींगापूर्वी पहिल्या दहा मिनिटांत प्राधान्य दिले जाणार आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटांनासुद्धा तिकीट खिडकी सुरु होण्याच्या दहा मिनिटांपूर्वी तिकीट बुक करण्याची सुट मिळणार नाही. त्यामुळे आधार कार्डद्वारे आयआरसीटीसी खाते व्हेरिफाय करणे गरजेचे झाले आहे.

इंडियन रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकींग प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी योजना तयार केली आहे. त्यासाठी काही नियम कठोर करण्यात आले आहे. आधार व्हेरिफायईड अकाऊंटलाच तत्काळ तिकीट बुकींगसाठी परवानगी असणार आहे. बुकींगसाठी आधार कार्ड आधारित ओटीपी ऑथेंडिकेशन गरजेचे असणार आहे. तसेच काउंटरवरील तिकीट बुकींगसुद्धा आधार व्हेरिफाईड करुनच बुकींग केली जाणार आहे.

रेलमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, इंडियन रेल्वे तत्काळ बुकींगसाठी लवकरच ई-आधार ऑथेंटिकेशन सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांनाच त्यांच्या गरजेचा वेळी या सुविधेचा वापर करता येणार आहे. २४ मे ते २ जूनपर्यंत शयनयान श्रेणीत रोज सरासरी १,१८,५६७ तिकीटांची बुकींग झाली. त्यातील ४,७२४ तिकीट म्हणजेच जवळपास चार टक्के तिकीट पहिल्या मिनिटातच बुक झाली. तर २०,७८६ तिकीट दुसऱ्या मिनिटात बुक झाली. ६६.४ टक्के तिकीटांची बुकींग तिकीट खिडकी उघडल्यानंतर पहिल्या दहा मिनिटात झाली.