रेल्वेचा मोठा निर्णय ! आता तिकीट तपासताना होणाऱ्या वादावर रेल्वेने शोधला उपाय…

भारतीय रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. भारतीय रेल्वे आता तिकीट चेकिंग सिस्टीमला संपूर्ण हायटेक बनवण्याची तयारी करत आहे.

रेल्वेचा मोठा निर्णय ! आता तिकीट तपासताना होणाऱ्या वादावर रेल्वेने शोधला उपाय...
TTE
| Updated on: May 15, 2026 | 8:00 PM

भारतीय रेल्वे आता तिकीट चेकिंग सिस्टीमला संपूर्ण हायटेक बनवण्याची तयारी करत आहे. लवकरच ट्रेनमध्ये तिकीट तपासणी करणारे TTE म्हणजे ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर बॉडी कॅमेरे घालून ड्यूटी करताना दिसणार आहे. या नव्या सिस्टीममुळे प्रवासी आणि टीटीई अशा दोन्हींची सुरक्षा वाढेल असे यामागे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच वादविवाद आणि खोट्या तक्रारी यांच्यावरही रोख लागणार आहे.

रेल्वेच्या नव्या मोहिमे अंतर्गत तिकीट तपासणी करताना सर्व एक्टीव्हीटी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली जाणार आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये होणारे वाद आणि विवाद तसेच इतर वाईट वागणूक याला संपूर्ण व्हिडीओ पुरावा म्हणून उपयोगी पडणार आहे.

कसे काम करणार बॉडी कॅमेरा सिस्टम?

रेल्वेद्वारे टीटीईला दिले जाणारे बॉडी कॅमेरे छोटे आणि आधुनिक फिचर्सने सुसज्ज होतील. या कॅमेऱ्यात एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंग, नाईट व्हीजन आणि ऑडिओ रिकॉर्डिंग सारखी सुविधा मिळेल. सर्वात खास बाब म्हणजे कॅमेऱ्यात सुमारे २० तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप मिळेल. ज्यामुळे लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्येही रेकॉर्डिंग जारी राहू शकते. याशिवाय या कॅमेऱ्याला टेम्पर प्रुफ बनवले आहे. त्यामुळे या रेकॉर्डिंगशी छेडछाड करणे शक्य होणार नाही.

या शहरात सुरु होणार पायलट प्रोजेक्ट

रेल्वेने सध्या या नव्या व्यवस्थेला पायलट प्रोजेक्ट म्हणून काही डिव्हीजनमध्ये सुरु केले जाणार आहे. यात मुंबई, वॉल्टेअर आणि रायपूर डिव्हीजनचा समावेश आहे. या क्षेत्रातील TTE ना बॉडी कॅमेऱ्यांचा वापर करण्याची खास ट्रेनिंग दिले जाणार आहे. रेल्वेच्या मते हा प्रयोग यशस्वी झाला तर देशभरात हा प्रयोग लागू केला जाणार आहे.

प्रवासी आणि टीटीई दोघांचा फायदा

अनेकदा तिकीट तपासणी करताना प्रवासी आणि टीटीई यांच्यात वाद होतात. काही प्रकरणात खोट्या तक्रारी देखील केल्या जातात. आता अशा प्रकरणात कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग आता पुरावा म्हणून कामाला येणार आहे. यामुळे टीटीईवर खोटा आरोप करण्याची शक्यता कमी होईल. आणि प्रवाशांच्या तक्रारींचा तपास करणेही शक्य होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवासामध्ये शिस्त आणि पारदर्शकता वाढणार आहे.

रेल्वे वापरत आहे नवे तंत्रज्ञान

गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वे सतत नवे तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे. ऑनलाईन तिकीटींग, एआय आधारित टेहळणी आणि स्मार्ट स्थानकांनंतर आता बॉडी कॅमेरा सिस्टीम देखील या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे.

Follow Us