इंडिगोचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी जाणारी सर्व उड्डाणे 30 नोव्हेंबरपर्यंत रद्द; 4 शहरांवर होणार परिणाम

सध्याची सुरक्षा परिस्थिती पाहता, इंडिगोने महत्त्वाच्या चार ठिकाणाहून येणारी आणि जाणारी आपली सर्व उड्डाणे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत रद्द केली आहेत. हा ही जागा आणि नेमकं यामागचं कारण काय याबद्दल जाणून घ्या.

इंडिगोचा मोठा निर्णय! या ठिकाणी जाणारी सर्व उड्डाणे 30 नोव्हेंबरपर्यंत रद्द; 4 शहरांवर होणार परिणाम
IndiGo Cancels all Saudi Arabia flights
| Updated on: Nov 19, 2026 | 7:57 AM

IndiGo Cancels all Saudi Arabia flights: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने सौदी अरेबियासाठीची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यामागे त्या सध्याची सुरक्षा परिस्थिती हे कारण दिलं आहे. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत येणारी आणि जाणारी अशी दोन्ही बाजूची उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. इंडिगोने एडवाइजरी जारी केली आहे. या एडवाइजरीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सौदी अरेबियातील सध्याची सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णय 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहील. विमान कंपनीने पुढे असेही नमूद केले की, ज्या प्रवाशांवर याचा परिणाम झाला आहे, त्यांना बुकिंगच्या वेळी दिलेल्या फोन नंबरच्या माध्यमातून सूचित केले जात आहे.

इंडिगोने बुधवारी 18 नोव्हेंबर रोजी एक ट्रॅव्हल एडवाइजरी प्रसिद्ध केली. यामध्ये सांगितले गेले की सौदी अरेबियातील चार प्रमुख शहरांमध्ये जाणारी सर्व सर्व्हिसेस महिन्याच्या शेवटपर्यंत रद्द राहतील. इंडिगोने सौदी अरेबियातील कोणत्या चार शहरांकडे जाणारी आणि तिथून येणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत हे जाणून घ्या.

Loading...

जेद्दाह

मदिना

रियाध

दम्माम

महत्त्वाचे म्हणजे इंडिगोने आपल्या एडवाइजरीमध्ये कोणत्याही सवलतींचा उल्लेख केलेला नाही आणि असे म्हटले आहे की, या कालावधीत या ठिकाणांहून येणारी आणि जाणारी सर्व विमानाच्या सर्व्हिसेस प्रभावित होतील. सौदी अरेबियामध्ये सुरक्षेशी संबंधित घडामोडी घडत असल्याने ही घोषणा करण्यात आली आहे. मात्र, विमान कंपनीच्या निवेदनात या निर्णयामागच्या विशिष्ट सुरक्षा चिंतेबाबत कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

प्रवाशांना कशी माहिती दिली जाईल?

या घोषणेमुळे ज्या प्रवाशांनाच्या प्रवासावर परिणाम झाला आहे त्यांना त्यांनी बुकिंगच्या वेळी दिलेल्या माहितीच्या आधारे संपर्क साधला जात आहे. विमान कंपनीने प्रवाशांना खात्री दिली आहे की, या काळात त्यांना वेळोवेळी माहिती दिली जाईल . याशिवाय त्यांना आवश्यक मदत पुरवली जाईल. ज्या प्रवाशांनी या चार शहरांतून किंवा शहरांकडे जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते त्यांना इंडिगोने नियमितपणे मेसेज आणि मेल तपासावा असे सांगितले आहे.

इंडिगोचं लक्ष परिस्थितीवर!

विमान कंपनी इंडिगो ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. एका निवेदनात इंडिगोने म्हटले आहे की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत. विमान कंपनीने स्पष्ट केले की, त्यांच्या ग्राहकांची आणि कर्मचारी सदस्यांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा खात्री दिली की, विमान रद्द होण्याच्या या काळात प्रवाशांना सर्व शक्य मदत पुरवली जाईल.

ही सूचना सध्या 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत नियोजित असलेल्या उड्डाणांसाठी लागू आहे. उड्डाण वेळापत्रकातील कोणतेही बदल किंवा अधिक माहिती, परिस्थिती कशी बदलते होते यावर ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us