गुवाहाटी येथील एका हॉटेलात अंधाधुंद गोळीबार, सहा जणांचा मृत्यू

आसामच्या गोवाहाटीच्या बोरा सर्व्हीस भागात झालेल्या अंधाधुंद गोळीबारात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत महिलांसह अनेक लोक जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. बातमीनुसार हा गोळीबार हॉटेट बिलास येथील गल्लीतील ज्वेलर्सच्या आऊटलेटजवळ घडला आहे. या प्रकरणातील अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.

गुवाहाटी येथील एका हॉटेलात अंधाधुंद गोळीबार, सहा जणांचा मृत्यू
firing at a hotel in Guwahati; six people dead
| Updated on: Oct 26, 2026 | 11:21 PM

आसामच्या गोवाहाटीच्या बोरा सर्व्हीस भागात झालेल्या अंधाधुंद गोळीबारात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत महिलांसह अनेक लोक जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. बातमीनुसार हा गोळीबार हॉटेट बिलास येथील गल्लीतील ज्वेलर्सच्या आऊटलेटजवळ घडला आहे. या प्रकरणातील अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.

हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही

पोलीस या घटनेसंदर्भात माहिती गोळा करीत आहेत. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात दोन महिलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हॉटेल बिलास इनच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

Loading...

गुवाहाटीचे पोलीस आयुक्त पार्थ सारथी महंत यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पत्रकारांना सांगितले, “आम्हाला चार मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहेत.” ते पुढे म्हणाले की आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे, परंतु त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत काही इतर पादचारी देखील जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना अन्य दोघांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us