AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abortion Kits Seized : नवरात्रौत्सवाआधी 92 लाख गर्भपाताचे किट जप्त, मोठ्या कारस्थानाचा संशय, भाजप आमदाराकडून चौकशीची मागणी

Abortion Kits Seized : नवरात्रीच्या आधी गर्भपाताच्या किटचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. गर्भपाताच्या औषधांचा पुरवठा कुठून झाला आणि ते कुठे-कुठे पाठवले जाणार होते, त्याचा शोध घेत आहोत असं कलेक्टर शिवम वर्मा यांनी सांगितलं.

Abortion Kits Seized : नवरात्रौत्सवाआधी 92 लाख गर्भपाताचे किट जप्त, मोठ्या कारस्थानाचा संशय, भाजप आमदाराकडून चौकशीची मागणी
BoxesImage Credit source: Representative Image
| Updated on: Sep 30, 2026 | 4:04 PM
Share

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. नवरात्रीच्या आधी इंदोरमधून गर्भपाताच्या किटचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात इंदूरला मिनी मुंबई म्हणतात. औषध विभागाने 19 हजारापेक्षा जास्त किट जप्त केले. त्याची किंमत 92 लाख रुपयाच्या घरात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे किट जप्त झाल्याने सप्लाय कुठून होतोय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजप आमदार उषा ठाकूर यांच्या मते हे सगळं प्रकरण गंभीर आहे. संपूर्ण नेटवर्कच्या चौकशीची मागणी होत आहे. गर्भपाताच्या औषधांचा पुरवठा कुठून झाला आणि ते कुठे-कुठे पाठवले जाणार होते, त्याचा शोध घेत आहोत असं कलेक्टर शिवम वर्मा यांनी सांगितलं.

इंदूरमध्ये गर्भपाताच्या किट विरोधात औषध विभागाने मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्भापताचे किट जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या किटची संख्या 19 हजारपेक्षा जास्त आहे. त्याची किंमत 92 लाखाच्या घरात आहे. विना परवानगी आणि नियम मोडून इतक्या मोठ्या प्रमाणात गर्भपात औषधांचा साठा केल्याने प्रशासनाने आता चौकशी सुरु केलीय. इतका औषधांचा साठा आला कुठून आणि इंदूरमध्ये तो कुठे-कुठे पाठवला जाणार होता? याचा शोध घेतला जात आहे.

आधीच टीप मिळाली होती

भाजपं आमदार उषा ठाकूर यांनी यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केलेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधं विकली जात असतील आणि त्याचा साठा सापडणं हे सामान्य काळाबाजाराचा प्रकरण वाटत नाही. त्यांनी संपूर्ण सप्लाय नेटवर्कची सखोल चौकशी करुन दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आधीच टीप मिळाली होती. त्या आधारावर प्रशासनाच्या टीमने ही कारवाई केली. बेकायद गर्भपाताचे किट जप्त केले. आता प्रशासन ही औषधं कुठून आली त्याचा शोध घेतय. जे लोक या प्रकरणात दोषी आढळतील, त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असं कलेक्टर शिवम वर्मा यांनी सांगितलं.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...