आजवर कुणीच केलं नसेल असं थलपती विजय यांनी केलं… क्रिकेटरपासून अभिनेत्यापर्यंत… कॅबिनेटमध्ये कोण कोण?

Tamil Nadu CM Vijay Oath: आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी थलपती विजय यांनी शपथ घेतील. दरम्यान, टीव्हीके सरकारमध्ये सामील होणाऱ्या मंत्र्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये क्रिकेटरपासून अभिनेत्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे.

आजवर कुणीच केलं नसेल असं थलपती विजय यांनी केलं... क्रिकेटरपासून अभिनेत्यापर्यंत... कॅबिनेटमध्ये कोण कोण?
CM-Vijay
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 10, 2026 | 11:50 AM

तमिळनाडूच्या राज्यपालांनी ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख विजय यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. आज सकाळी १० वाजता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासोबतच मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या शिलेदारांची यादीही समोर आली असून, यामध्ये विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे.

१. सेंगोट्टैयन

AIADMK चे अत्यंत ज्येष्ठ नेते राहिलेले सेंगोट्टैयन 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. जयललिता आणि ईपीएस सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत. AIADMK मधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी TVK मध्ये प्रवेश केला आणि गोबीचेट्टीपलयम मतदारसंघातून विजय मिळवून सर्वांना थक्क केले.

२. एन. आनंद

TVK चे सरचिटणीस एन. आनंद हे विजय यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. पुडुचेरीचे माजी आमदार राहिलेले आनंद गेल्या १५ वर्षांपासून विजय यांच्या संघटनेशी जोडलेले आहेत. त्यांनी टी. नगर मतदारसंघातून विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे.

३. आधव अर्जुन

ऑल बास्केटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष असलेले आधव अर्जुन हे खेळ आणि राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत प्रभावशाली आहेत. त्यांनी विल्लीवक्कम मतदारसंघातून DMK च्या दिग्गज नेत्याचा पराभव केला आहे. त्यांना विजय यांच्या कोअर टीममधील महत्त्वाचा चेहरा मानले जाते.

४. सी.टी.आर. निर्मल कुमार

विजय यांच्या पक्षाची डिजिटल आणि सोशल मीडिया रणनीती आखण्यात निर्मल कुमार यांचा मोठा वाटा आहे. यापूर्वी त्यांनी AIADMK आणि भाजपसाठीही काम केले आहे. TVK साठी सोशल मीडिया व्हॉलंटियर्सची फौज उभी करण्याचे श्रेय त्यांना जाते.

५. राज मोहन अरुमुगम

प्रसिद्ध युट्यूब चॅनेल ‘Put Chutney’ मुळे राज मोहन तरुण पिढीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. डिजिटल कंटेंट क्रिएटर ते राजकारणी असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी एग्मोर मतदारसंघातून विजय मिळवला असून ते पक्षाचे उपसरचिटणीस आहेत.

६. वेंकटरमण

‘ऑडिटर वेंकटरमण’ म्हणून ओळखले जाणारे हे नेते विजय यांचे अत्यंत विश्वासू आहेत. मायलापुर मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या तमिळिसाई सौंदरराजन आणि DMK च्या तगड्या उमेदवाराचा पराभव केला. पक्षाची आर्थिक धोरणे आखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

७. अरुण राज

निवृत्त आयआरएस (IRS) अधिकारी असलेले अरुण राज यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे. त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीचे शिक्षण घेतले आणि नंतर नागरी सेवांमध्ये प्रवेश केला. २०२५ मध्ये त्यांनी TVK मध्ये प्रवेश केला आणि तिरुचेंगोड मतदारसंघातून विजय मिळवला.

८. मुस्तफा

मदुराय सेंट्रल मतदारसंघातून निवडून आलेले मुस्तफा हे टीव्ही डिबेट्समधील पक्षाचा आक्रमक चेहरा आहेत. विजय मक्कल इयक्कम या संघटनेत त्यांनी दीर्घकाळ काम केले असून ते पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणूनही ओळखले जातात.

९. एस. कीर्तना

सिवाकासी मतदारसंघातून विजयी झालेली २९ वर्षांची कीर्तना ही TVK ची सर्वात तरुण आमदार आहे. राजकारणात येण्यापूर्वी ती पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम करत होती. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून येणाऱ्या कीर्तनाला विजय यांनी संधी दिली आणि तिने पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवला.

१०. टी.के. प्रभु

पेशाने डॉक्टर असलेले टी.के. प्रभु यांना लोक प्रेमाने “प्रभु सर” म्हणतात. त्यांनी कारैकुडी मतदारसंघातून NTK प्रमुख सीमन यांचा पराभव करून मोठा राजकीय उलटफेर केला आहे.

Follow Us