परीक्षेत नापास झाल्याने वडिलांनी सुनावलं; तोच बनला IPS, मोहिबुल्लाह अंसारींची कहाणी थेट अमेरिकेत, ‘हा’ पुरस्कार मिळणार
शालेय जीवनात अभ्यासात कच्चा असलेला आणि प्री-बोर्डमध्ये नापास झालेला एक विद्यार्थी भविष्यात आयपीएस अधिकारी बनतो आणि थेट अमेरिकेत पुरस्कार मिळवतो, ही कथा एखाद्या चित्रपटासारखी वाटते, पण हे खरं खरं घडलं आहे. जाणून घ्या सगळी गोष्ट...

शालेय जीवनात अभ्यासात मागे असलेला आणि बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल मुलगा पुढे देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून IPS अधिकारी बनतो, ही कहाणी बिहारच्या मोहिबुल्लाह अंसारी यांची आहे. मुजफ्फरपूरचे विद्यमान सिटी एसपी असलेल्या अंसारी यांच्या या प्रवासाची आता अमेरिकेत दखल घेण्यात आली आहे. 13 डिसेंबर 2026 रोजी फ्लोरिडातील टाम्पा येथे होणाऱ्या सातव्या वर्ल्ड फेअर अँड फेस्टिव्हल 2026 मध्ये त्यांना द एशियन हिरो अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यामध्ये 13 डिसेंबर 2026 रोजी सातव्या जागतिक जत्रा आणि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशन ऑफ वर्ल्ड्स फेअर्स अँड फेस्ट्स यूएसए इंक या संस्थेकडूनी अंसारी यांना हा सन्मान दिला जाणार आहे. लोकसेवा, उत्कृष्ट नेतृत्व आणि प्रामाणिकपणे केलेल्या समाजकल्याणासाठी त्यांची या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
वडिलांच्या बोलण्याने मिळाली कलाटणी
मूळचे बिहारमधील सिवान जिल्ह्याचे रहिवासी असलेले मोहिबुल्लाह शालेय जीवनात अभ्यासात खूपच मागे होते. 10 वी आणि 12 वीच्या सराव परीक्षांमध्ये ते नापास झाले होते. आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न असेल तर आधी साध्या परीक्षेीत पास होण्याइतके गुण तरी मिळवून दाखव, असे वडिलांनी त्यांना अत्यंत कठोर शब्दांत सुनावले होते. वडिलांचे हेच बोलणे मोहिबुल्लाह यांच्यासाठी खऱ्या अर्थाने कलाटणी देणारे ठरले.
खडतर प्रयत्नांतून मिळवले यशी
त्यानंतर त्यांनी स्वतःला अभ्यासात पूर्णपणे झोकून दिले. प्रचंड मेहनतीच्या जोरावर संयुक्त प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करत 2011 मध्ये त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली येथे रसायन अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळवला. तिथून पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ खासगी उद्योग क्षेत्रात नोकरी केली. पण देशसेवेच्या ओढीने त्यांनी ती नोकरी सोडली आणि 2015 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.
तिसऱ्या प्रयत्नात साकारले स्वप्न
सुरुवातीच्या प्रयत्नांत अपयशी होऊनही ते खचले नाहीत. अखेर सलग 3 प्रयत्नांनंतर त्यांनी अखिल भारतीय स्तरावर 381 वा क्रमांक मिळवून भारतीय पोलीस सेवेतील पद खेचून आणले. शालेय जीवनात नापास होण्यापासून ते थेट अमेरिकेत मानाचा पुरस्कार स्वीकारण्यापर्यंतचा मोहिबुल्लाह अंसारी यांचा हा थक्क करणारा प्रवास आज लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी प्रेरणा बनला आहे.
